तुम्ही लॉजिक (तर्कशास्त्र...?) मधल्या ऍड होमिनेम फॅलसि चा उपयोग करता आहात असे वाटते. सदर चर्चा तेजोमहालयाबद्दल चालू आहे. रोम-राम, ख्रिस्त-कृष्ण, महंमद-हिंदू या विषयांबद्दल नाही. ओकांचे या इतर विषयांवरचे 'संशोधन' वादग्रस्त नव्हे तर कधी कधी हास्यास्पद सुद्धा आहे. कारण ते फक्त त्यांचे तर्क आहेत. पण तेजोमहालयाची गोष्ट वेगळी आहे असे वाटते. त्याचा प्रत्यक्ष पुरावा समोर आहे. सुदृढ दृष्टी आणि सरासरी बुद्धिमत्ता असलेली कोणतीही व्यक्ती त्यांची निरीक्षणे तपासून पाहू शकते असे वाटते.

ओकांचे इतर तर्क चुकीचे आहेत म्हणून 'तेजोमहालय' सुद्धा चुकीचे आहे म्हणणे म्हणजेच ऍड होमिनेम फॅलसि असे वाटते.

सर्वोच्च न्यायालयाचे म्हणाल तर न्यायदेवता आंधळी असते, जे पारडे जड तिकडेच झुकणार. ते पारडे कशाकशाने "जड" होऊ शकते हे सर्व भारतीय जाणतात असे वाटते.

नॅप या त्रयस्थ माणसाच्या निरीक्षणांबद्दल आपले काय मत आहे? सदर वास्तूतील अनेक दालने बंद आहेत, ती शेकडो वर्षे आम जनतेला बंद असण्याबद्दल आपले काय मत आहे?