सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावाने ग्रासलेल्या आपल्या जिवनात शिवधर्म निखळ हास्य फुलवू शकतो.

शिवधर्माचे संस्थापक महोदय ( ज्यांची पत्नी मनूवादी भाजपची आमदार आहे ) यांची जहाल भाषणे, शिवधर्माच्या आद्य धर्मगुरूसाहेबांनी लिहिलेली संहिता व विविध पुस्तिका वाचून या करमणूकप्रधान व विनोदी उपक्रमाबद्दल माझ्या मनात तरी ही खात्री निर्माण झाली आहे.

पण संस्थापक महोदय उठ्सुठ ज्या जातीचे रक्त सांडायला सज्ज व्हा असे आवाहन करत असतात त्या जातीच्या लोकांना या धर्मात प्रवेश नसल्याने मी या लाभापासून वंचित राहिलो आहे..

यांची लागोपाठची दोन कलमे अशी.

अ) शिवधर्मात जात पात मानली जाणार नाही. सर्वांना मुक्त प्रवेश.
ब) ब्राम्हणांना या धर्मात प्रवेश दिला जाणार नाही.

असो.. एकनाथ यांनी काही योग्य मुद्दे मांडले आहेत.