एकंदरीत येथे धर्मयुद्ध पेटणार असे दिसते!

तसे हिंदू धर्मातून आजवर बरेच लोक नवे धर्म/पंथ काढून बाहेर पडले. कदाचित त्यांची नावे तुम्हाला आठवत असतीलही. पण गमतीची गोष्ट अशी की, हे सर्व फ़ुटीर शेवटी त्यांच्याही नकळत हिंदू संस्कृतीमधेच सामवले गेले.

आजही नवबौद्ध, जैन दिवाळी साजरी करतात. हिंदू सणांना घरासमोर रांगोळी काढतात. हळदी-कुंकवाचे समारंभ करतात. इतकेच काय खेडोपाडी धर्मांतरीत मुसलमानही हिंदू रीतीरिवाज पाळतात. त्यांच्या बायका मंगळसूत्र घालतात, कुंकू लावतात.

थोडक्यात, अशी वेगळी चूल मांडण्याने सामाजिक/आर्थिक परिस्थितीमधे फ़ारसा फ़रक पडत नाही. वर्गसंघर्ष हा प्रत्येक धर्मात असतोच. कारण तो मनुष्याचा स्थायीभावच आहे. जंगलातील टोळीयुद्धाचे हे नागरीकृत स्वरुप आहे इतकेच.

राग न मानाल तर, तुम्हाला पळपुटे का म्हणु नये? ज्या भूमीवर तुम्ही जन्मला त्याच भूमीतल्या धर्माला तुम्ही पाठ दाखवता? आपल्या धर्मातून बाहेर पडून त्यावरच वार करायचे हा घरभेदीपणा नव्हे काय? हिंदू धर्म काही कुणा एका वर्गाला आंदण दिलेला नाही...

असो.

समाज जितका एकजिनसी तेवढी त्याची ताकद जास्त.

अशा विभाजनामुळे आपली सामाजिक ताकद मात्र क्षीण होते आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते.