पुना ओक हे ताजमहाल व अन्य भारतीय वास्तुंबद्दल बोलताना मुद्देसूद बोलतात. त्यातील अनेक मुद्दे दुर्लक्षिण्याइतके क्षुल्लक नाहीत. पण नंतर नंतर हे गृहस्थ वहावत गेले. उथळ आणि बाष्कळ शब्दच्छल करुन वडाची साल पिंपळाला जोडण्याचे प्रकार केल्यामुळे ते आचरटपणाचे वाटते. मी ह्या "संशोधना"वर विश्वास ठेवणार नाही. पण म्हणून त्यांचे सगळेच चुकीचे आहे असे म्हणणे अतिरेकीपणाचे आहे.
बहुतांशी सगळे पुना ओक विरोधी लोक "काय मूर्ख माणूस आहे. असे कसे असेल?" ह्याच अर्थाचे बोलतात आणि त्यांना खोडू पहातात.
भारतीय इतिहासमंडळाचे लोक अस्सल कम्युनिस्ट मुशीतून काढलेले आहेत. त्यांचा कल नकारात्मक असल्याचे वेळोवेळी दिसले आहे.
विपरित शिक्षण मिळालेली पिढी पुना ओकांच्या ताजमहालबद्दलच्या संशोधनाला झिडकारणारच.पण मलाही उत्सुकता आहे की हे विरोधक पुना ओकांच्या कुठल्या मुद्द्यांना खोडतायत ते बघण्याची.
सहमत.