समस्त जगाची संस्कृती शैव आणि वैष्णव अशा विचारात बसवण्याचा खटाटोप हास्यास्पद आहे.
ख्रिस्त हे नाव मुळात अस्तित्वात होते की नाही याविषयी मला शंका आहे. त्या भागात अरामिक की कुठलीशी भाषा बोलली जायची आणि त्यात त्या व्यक्तीचे नाव वेगळेच ऐकू येते. त्यामुळे कृष्णमास ख्रिस्तमास चा शब्दच्छल फार काही साधत नाही. इन्फ़ंट जिझस म्हणजे बाळकृष्ण ही त्यातलाच प्रकार. कृष्णजन्माची कथा आणि ख्रिस्ताची कथा यात काहीही साम्य वाटत नाही. असल्या ओढून ताणून बनवलेल्या गोष्टींनी मूळचे तथ्य असणारे मुद्देही हास्यास्पद बनतात.
असो. मूळ विषय वेगळा आहे.