नक्षी पाहून सुचलेले प्रश्न-
ताज पाहून सुचलेली उत्तरे.. (हे असे बरेच दावे काही वर्षापासून ऐकत आल्यानंतरची भेट बरं!)

१. ही नक्षी मूळ इमारतीचा भाग आहे की वाढवलेला भाग आहे?
मूळ इमारत! वाढवलेला भाग! ही जर मूळ इमारत नसेल तर मग चर्चाच मिटली!! ताज ज्याला म्हणतात त्याच्या दर्शनी भागावरच ही कलाकुसर आहे. ही जर त्या मूळ इमारतीचा भाग नसली तर मूळ इमारत आहे कोठे?
दावेदारांना खालीलपैकी नक्की काय म्हणायचे आहे?
१. आज ज्याला ताजमहाल म्हणतात तेच शिवमंदीर आहे.
२. आज ज्याल ताजमाहाल म्हणतात त्याच्या खाली/आत मूळ शिवमंदीरआहे.
३. आज ज्याला ताजमहाल म्हणतात तेथे पूर्वी एक शिवमंदीर होते जे आज अस्तित्वात नाही.
४. आजचा ताजमहाल हे त्या शिवंदीराचे भ्रष्ट स्वरूप आहे.

२. या नक्षीचा दगड आणि मूळ इमारतीचा दगड यांचा प्रकार एकच आहे का?३. या.न.द. आणि मू.इ.द. एकाच खाणीतून आले आहेत का?

अशी खात्री आजच्याही बांधकामात देत नाहीत हो! (मागत ही नाहीत :D). दगड हे एकाच खाणीतून आले तरी ते अगदीच सारखे असतील असे नाही. एकाच वेळी बांधलेल्या इमारतीतील सारे दगड एकाच खाणीतून आणतात असे नाही. ताज सारख्या मोठ्या प्रकल्पावर तर नाहीच नाही. शिवाय 'मूळ इमारत' म्हणजे काय हे अजून स्पष्ट व्हावे. (म्हणजे नक्की कुठले दगड व नक्षी 'मूळ' आहे.)

४. या.न.द. आणि मू.इ.द. यांचे वय/कालमान एकच आहे का?
दगडाचे वयोमान!!! या दगडाच्या परिक्षणातून संगमरवर या स्थलांतरीत खडकाच्या निर्मितीचे वयोमान कळणे अपेक्षित आहे की बांधकामाचे?

५. ही नक्षी आणि मूळ इमारतीवरील नक्षी यांचे वय/कालमान एकच आहे का?
म्हणजे काय? मूळ इमारतीवरील नक्षी कोणती? नक्षीचे वयोमान म्हणजे काय? ते कसे ठरवायचे बरे? (ते त्या नक्षीसाठी वपरलेल्या दगडाच्या वयोमनापेक्षा वेगळे कसे?)

आता त्या कलाकुसरीबद्दल..

ती कलाकुसर म्हणजे त्या अरबीमध्ये लिहीलेल्या कुराणातल्या ओळी आहेत असे कळते. (हिंदूंची नक्षी नव्हे.) या कला कुसरीचे वैशिष्ट्य असे की ताजसमोर उभारले असता खालील उंची वरून वर लिहीलेल्या ओळीतील  अक्षरांचा व बाजूस, खाली लिहीलेल्या अक्षरंचा आकार सारखाच दिसतो.  (अर्थात वरील अक्षरे गरजे प्रमाणे मोठी आहेत) हा एक कलाकुसरीचा अजोड नमुना आहे. 'ही जर मुसलमानांनी केलेली वाढ असेल' तर ह्यालाच 'चार चांद' लावणे म्हणतात. अशा बाबींना वाढीव म्हणून वगळल्यास आपले ते तेजोमहालय काही खास महान राहत नाही !

बाकी नेप्प किंवा ओकांची पुस्तकातील चित्रे पाहण्यापेक्षा एक चांगला स्थानिक मार्गदर्शकच आपल्याला ४०-४५ रुपड्यात ताजमहालाच्या बांधकामातील हिंदू कलाकुसरीचा प्रभाव ही उदाहरणे तिथल्या तिथे दाखवून देईल!! आपल्या भारत भेटीच्या प्रतिक्षेत. (त्यालाही आपल्याबरोबर ताजला पुन्हा भेट द्यायला आवडेल!)

मंदीरावरील देवदेवतांच्या मुर्ती काढल्याने ते मंदीर हिंदूचे होते असे नसूनते मंदीर हिंदूंचे असल्याने त्यावर देवदेवतांच्या मूर्ती असणे सहाजिक आहेएवढा साधा सरळ मुद्दा आहे झाले.