नीलकांत,
आपण चांगले व अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे.
मागे एका संकेतस्थळावर याच विषयी एका ब्राह्मण द्वेष्ट्याने शिवधर्मच्या पहिल्या मेळाव्याच्या निमित्ताने असेच लिहीले होते. त्या विद्वानाने असेही लिहीले होते की मराठा समाज आता संपूर्णतः हिंदूधर्म त्यागून शिवधर्माचा स्विकार करणार असून मराठा महासंघही याचा पुरस्कार करीत आहे.
मी मराठा महासंघाच्या युवा विभागाचा माजी पदाधिकारी व त्याचे निवृत्त न्यायाधिश असलेले वडील यांच्या कडे या संबंधी विचारणा केली असता त्यांनी ही विधाने साफ धुडकावून लावली. काही मूठभर व्यक्तिंनी आपल्या मतलबासाठी उगाच मराठा समाजाला वेठीस धरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सर्वापलीकडे जाउन एकच गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी की हिंदु धर्म हा अत्यंत सहिष्णु असून तो कुणावरही कसलीही सक्ती करत नाही. ज्याला दुसरा कुठला धर्म बरा वाटेल त्याने तो भले स्विकारावा, हिंदु धर्म त्याचा धिक्कार वा तीरस्कार कधीच करत नाही.
ज्यांना हा धर्म त्याज्य वाटतो त्यांनी त्याचा त्याग करणे हेच इष्ट आहे, मात्र त्यांनी उगाच फालतु व न पटणारी असमर्थनीय कारणे देउ नयेत. जायचे त्यांनी खुशाल जा, त्यांच्या जाण्याने हिंदु धर्माचे काय होइल ही चिंता त्यांनी अजिबात करू नये.
श्वापदाने गुहेत आश्रय घेतल्याने ते अंधारात लपून जाते पण म्हणून सर्यास्त झाला असे त्याने समजू नये.
सूज्ञ मनोगतींनी अशा प्रकारच्या कोणत्याही फुटिरवादी लेखांना प्रतिसाद अजिबात देउ नये हेच बरे.