मायक्रोसॉफ़्टची मराठी संगणकीय प्रणाली येत आहे असे वाचनात आल्याचे स्मरत आहे.
असेलही. पण जर संकेतस्थळांनी युनिकोडचा वापर केला तर कोणत्याही प्रणालीवर ते व्यवस्थित बघता/वापरता येतील. मनोगत हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.
मराठी keyboard अस्तित्वात आहे का?
मॅक प्रणालीसाठी म्हणत असाल तर कल्पना नाही.
पण तेव्हा पासून मनोगत, ई-सकाळ, म. टा. इत्यादी संकेत स्थळे वाचणे अशक्य झाले आहे. ह्या पैकी कोणतीच स्थळे ऍपलवर वाचता येत नाही.
फायरफॉक्स वापरून हा प्रश्न सोडवता येईल. फायरफॉक्स चे पद्म हे एक्स्टेन्शन ई-सकाळ सारख्या युनिकोड न वापरणाऱ्या संकेतस्थळांवरील मजकूर मागणीनुसार (ऑन-द-फ्लाय) युनिकोड मध्ये रूपांतरित करते. याचा अजून एक फायदा असा की हा रूपांतरित मजकूर इतर कोणत्याही प्रणालीत चिकटवता येतो!
-(फायरफॉक्स समर्थक) परीक्षित
ता.क. - मराठी रेमिंगटन कळफलक वापरता येत असल्यास इंडीक आय. एम. ई. हे एक्स्टेन्शनही जरूर वापरून पाहा.