नुकतेच मी फाटकांच्या खिडकीला कंटाळून (म्हणजे Gates च्या Windows ला) ऍपल प्रणालीवर स्थित्यंतर केले. पण तेव्हा पासून मनोगत, ई-सकाळ, म. टा. इत्यादी संकेत स्थळे वाचणे अशक्य झाले आहे. ह्या पैकी कोणतीच स्थळे ऍपलवर वाचता येत नाही. ह्यावर तोडगा काय? का संगणकावर मराठी वाचायचे असल्यास फाटकांचे पाय धरणे आले?

नको नको, पाय धरू नका. विंडोज़ ला कंटाळलेले (कंटाळलेले म्हणण्यापेक्षा अपेक्षाभंग झालेले) असंख्य लोक आहेत. मॅक वापरताय ठिक आहे. पण (माझ्यामते) स्विच मारायचा* असेल तर लिनक्स सर्वात उत्तम!

सर्व नव्या लिनक्स प्रणाल्यात युनिकोड पाठिंबा मूळचाच आहे (मनोगत, bbc हिंदी, मटा थेट पाहू शकता) परीक्षितरावांनी सांगितलेले फायरफॉक्स प्लुगिन वापरून इ-सकाळ सारखी युनिकोडित नसलेली संकेतस्थळेही पाहू शकता. शिवाय देवनागरी/बोलनागरी कीमॅप वापरून हवे तिथे देवनागरी टंकता येते.आणखी काय हवे?

आपला,
(लिनक्सप्रेमी) शशांक

* "स्विच 'मारणे'" हा वाक्प्रचार आजकल रूढ झालेला आहे :)