अगदी नेमकी समस्या हाताळलीस !! जीव नकोसा होतो त्या वासाने ! त्यातून ए सी मधे तर धुराचा वास कोंडून राहतो. आमच्या इथे एक 'चालतं बोलतं धुराडं' होतं. तो आला की थोडावेळ आम्ही सगळे तिथून उठून थोडावेळ दूर जायचो. सध्या आमचे ऑफिस असलेल्या इमारतीच्या जिन्यामधे धूम्रपान करणाऱ्यांचे राज्य असते. जरा व्यायाम म्हणून लिफ्ट ऐवजी जिन्याने जावे म्हटले तर पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे !
पण वेदश्री, तू म्हणतेस तसे खरेच या कारणासाठी कोणी प्रोजेक्ट बदलून देत असेल असा विश्वासच वाटत नाही. किंवा प्रोजेक्ट साठी कोणी धूम्रपान सोडायला तयार होईल असेही वाटत नाही.