पण वेदश्री, तू म्हणतेस तसे खरेच या कारणासाठी कोणी प्रोजेक्ट बदलून देत असेल असा विश्वासच वाटत नाही. किंवा प्रोजेक्ट साठी कोणी धूम्रपान सोडायला तयार होईल असेही वाटत नाही.
सुखदा, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. वर केलेलं लेखन हा माझा अथवा कोणाचा अनुभव नसून माझे एक स्वप्न आहे. 'धूम्रपान न करणाऱ्यांचा गट' असता आणि त्यात मला काम करता आले असते तर किती बरं झालं असतं, असं नेहमी वाटतं. असं प्रत्यक्षात कधी घडेल की नाही माहित नाही, पण हा त्रास अगदी असह्य आहे मलातरी.तू जिवंत धुराड्यांबद्दल जे म्हणालीस ते अगदी मान्य आहे मला. ह्या त्रासापासून लवकर सुटका होवो, हीच प्रार्थना. तुझ्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद.