सर्वसाक्षीकाका,

तुमच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही म्हणालात तसं खरंच प्रत्येक धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीने इतरांचाही विचार केला तर खूप खूप बरं होईल. कथा लिहिण्यामागचा मूळ हेतू तुम्हाला पटला याचा मला अत्यंत आनंद आहे.

या कल्पनाविलासात बरीच पात्र आहेत. पैकी स्वरुपा सगळे उपाय करून थकली आहे आणि म्हणून इतर टीममेंबर्स बदलू शकत नसल्याने मनाविरुद्ध प्रोजेक्टच बदलून मागत आहे. रुजुता मालिनीकडे गेली नव्हती तर मालिनी स्वतःच एका मैत्रिणीच्या नात्याने तिच्याकडे चौकशी करायला आली म्हणून रुजुताने सांगितले. मालिनी तिच्या अधिकारक्षेत्राचं भान सांभाळून तिच्या ग्रुपसाठी जे करू शकते त्याबद्दल विचारते ज्याबद्दल तिला योग्य ते मार्गदर्शन होतं आणि त्याबरहुकुम कारवाई करता तिला आनंदकडून होकारात्मक प्रतिक्रिया मिळते, असं म्हला सांगायचं होतं. प्रकटनात चुका झाल्या असतील आणि त्या मी नक्कीच सुधारायचा प्रयत्न करेन.

तुमच्या इतक्या छान मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. प्रकटनात वेगळी शैली हातळण्याचा आणि प्रश्नांना हाताळण्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करण्याचाही मी जरूर प्रयत्न करेन.