वेदश्री,
कथाविषय चांगलाच आहे व समाजाच्या काही थरात तरी धूम्रपानाला कसा वैयक्तिक व सामूहिक विरोध होतो आहे हे कथेच्या माध्यमातून दर्शविण्याचा तुझा प्रयत्न स्तुत्य आहे. पण एकंदरीत कथा,त्यातील मुलीने केलेली 'उपाययोजना' व धूम्रपान करणाऱ्या मुलाचे चटकन 'ह्रदयपरिवर्तन' फारच सरळ, सोपे व (सर्वसाक्षी म्हणतात तसे) बाळबोध वाटते. (हे सर्व प्रामाणिकपणे लिहीत आहे व तू गैरसमज करून घेणार नाहीस या बद्दल खात्री आहे)

धूम्रपान व धूम्रपानी यांच्या बाबतीत काही माझी काही निरीक्षणे खाली देत आहे.

१) जाहिरातीतून व साहित्यातूनही स्त्रियांना धूम्रपान करणारे पुरुष 'रुबाबदार, मर्दानी व ऐटबाज वाटतात' याचे (किमान असा समज होईल असे) दाखले मिळतात. पूर्वी व आताही स्त्री-लेखिकांच्या कथांमधून 'नायक कसा ऐटबाजपणे सिगरेट शिलगावतो' ' त्याच्या ओठाच्या किनाऱ्यात तिरपी,स्टायलिशपणे धरलेली सिगारेट होती' ' तिने चट्कन पुढे होऊन लायटरने त्याची सिगारेट पेटवली' अशी वाक्ये अनेकदा आढळतात. असे वाचून शाळा-कॉलेजात जाणारी मुले  सिगरेट ओढायला लागलेली,मी शाळा-कॉलेजात असताना व नंतरही पाहिली आहेत.हा समज कमी होईल असे प्रयत्न जाहिरातीतून,साहित्यातून व प्रत्यक्ष वर्तनातून स्त्रियांनीच करावे.

२) या कथेतल्या मुलीने धूम्रपान करणाऱ्या मुलाला 'मला तुझे धूम्रपान करणे आवडत नाही' असे सरळ सांगितले असते तर त्याच्यावर जास्त लवकर परिणाम झाला असता. (एखादी गोष्ट किंवा सवय आवडत नाही असे एखाद्या तरुण स्त्रीने सांगितले तर पुरुष लवकर ऐकतात!)आजच्या मॉडर्न,सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणाऱ्या मुली नक्कीच एवढ्या धीट असतात.एवढ्या छोट्या प्रश्नासाठी 'बॉस'कडे जाण्याची काय गरज?अन आवडणारा प्रकल्प असेल तर तो त्या मुलीने का सोडावा?

३) लग्नासाठी मुलीने धूम्रपान करणाऱ्या मुलाला 'केवळ या कारणासाठी' नकार द्यावा.

४) कार्यालयात सर्वानीव महिन्यातून एक दिवस तरी 'ना-धूम्रपान दिवस' पाळावा.

(जयन्ता५२)