आजकाल रामदेव बाबांचे नाव खूप घेतले जाते.

अश्यांत माकप ने त्यांचे प्रकरण प्रसिद्ध करून खळबळ माजवली आहे. तेंव्हा हे बाबा पण आपला योगसाधनेने मिळवलेला संयम सोडून प्रत्येक शिबिरात राजकारण्यांप्रमाणे आरोप करत आहेत.

असो, त्यांचे योग प्रसाराचे कार्य खरोखर स्तुत्य आहे. पण काही प्रश्न उपस्थित होतात

१. योगा केल्याने सर्व रोग बरे होतात तर, मग त्यांनी औषधे का काढली आहेत.

२. सर्व वैद्य लुबाडतात आणि योगा सर्व रोग काही आठवड्यात बरे करू शकतो तर त्यांना दवाखाना काढण्याची गरज काय? ते स्वतः वैद्य नाहीत म्हणजे ते तरी प्रत्येक रूग्णावर इलाज करू शकणार नाहीत, मग तेथे असलेले वैद्य फसवणार नाहीत कशावरून?

३. त्यांच्या VCD मध्ये त्यांनी दावा केला आहे की ७ दिवसात त्यांनी योगाद्वारे कँसरची गाठ एक चतुर्थांश केली. मग हे टाटा हॉस्पिटल मध्ये जाऊन लाखो/ करोडो लोकांच्या दुवा का घेत नाहीत?

४. त्यांना मानव सेवाच करायची आहे तर ऐच्छिक देणगी घेऊन शिबिरे का घेत नाहीत. प्रत्येक शिबिरार्थी कडून फी का 'वसूल' करतात?

मला त्यांच्या बद्दल आकस नाही की अनुभव पण नाही. कदाचित मला पडलेले प्रश्न निरर्थकही असतील.  पण सहज जे वाटले ते लिहिले. बाकी ह्या बुवा लोकांबद्दल मला कसलाही आदर नाही.