प्रत्यक्ष धूर आणि धूम्रपानानंतर तोंडाला येणारी दुर्गंधी ह्या दोन्हीत फरक आहे.

चार जणं जर एकत्र बसून एखाद्या गोष्टीवर चर्चा करीत असतील आणि त्यातील एखादा (किंवा एखादी) त्याच वेळी धूम्रपान करीत असेल तर होणारा 'धुराचा' त्रास जास्त असतो. त्यामानाने धूम्रपानानंतर होणारा त्रास कमी असतो. बोलणारा आणि ऐकणारा ह्यांच्यात एका टेबलाचे अंतर अपेक्षित आहे. असो. धूम्रपान वाईटच. धूम्रपान करणाऱ्यांनी इतरांच्या स्वास्थासाठी, कचेरीतील आरोग्यदायी वातावरणासाठी स्वतःवर आवश्यक ती बंधने घालावीत. (खूप जणं अशी बंधने पाळतातही.) एखाद्या मीटिंग पूर्वी आणि मीटिंग चालू  असताना धूम्रपान टाळावे

धूम्रपान संपूर्णपणे सोडता आले तर उत्तमच.