तुझ्या फुलांचा इथे कसा हा गंध दाटतो
येउन इतका दूर कसा हा मला गाठतो...

ती दूर आहे, पण हृदयाच्या जवळ असल्याचा दाखला आहे.  वा! सुंदर.

समजावू मी अता कुणाला 'शांत राहणे'
क्रोधाग्नी हा प्रत्येकाच्या मनी धुमसतो...

कदाचित स्वतःशी सुद्धा हेच गाऱ्हाणे असते आपले.  पण स्वभावाला औषध नसते म्हणतात.  हो पण त्या क्रोधाग्नीवर लक्ष ठेऊन कर्तव्याचा चहा करायला कुणाचीच हरकत नसावी.  अबब, काय छान लिहिलेय.  शेर आवडला.

पावलांत या ताकद नव्हती पुढे चालण्या
हृदयी वारा भरून मी हा पुढे चालतो...

ईथे मात्र कुमारसाहेबांशी आम्ही पण सहमत आहोत. 

"आयुष्याची माती केली", लोक म्हणाले
शांतपणे मी पुन्हा नव्याने कविता रचतो...

झक्कास! खूपच छान.  "कोई तुफानों से कहदो जाकर, हमने फिरसे नया घर बसाया है" असे काहिसे वाचल्याची याद झाली.  मस्त शेर आहे. अबब, मजा आला.

आवरू कसा आयुष्याचा अता पसारा
पसाऱ्यात या 'अजब' 'मला' अन 'तुला' शोधतो...

बहोत सही, एक नंबर!

(रसिक) तुषार