कथेत खलनायक रंगवला आहे - खलनायिका नाही ! (लेखिकेची अपेक्षा ही असावी की, बायका "स्मोकिंग" करीत नाहीत व फक्त पुरूषच धुराची नळकांडी असतात - हे लेखिकेचे अ(ती)ज्ञान समजावे का?)
कथानकाची जाडी (पुस्तकासारखी) वाढवण्यासाठी बऱ्याच पांचट गोष्टींचे घेतलेले साहाय्य मात्र आवडले !
कंपनीच्या व्यवस्थापनाला सर्वानुमते दबाव आणून "नो स्मोकिंग" विभाग ठरवण्याला भाग पाडणे सहजशक्य असताना स्वरूपा, मालीनी ह्या नायिका हा द्राविडी प्राणायमाचा मार्ग का पत्करतात हे नाही कळले !
असो सर्व धुम्रनलीका ओढणाऱ्या व्यक्तींना हा इशारा देण्यात येत आहे की, मनोगतावर प्रवेश करण्यापूर्वी आपली धुम्रनलीका विझवून व तोंड स्वच्छ धुऊन मग प्रवेश करावा !