कोरले श्वासातुनी जे 
नाव का खोडुन गेला

--- चांगले आहे.

दूर जाताना अबोला
बोलका जोडुन गेला

--- आवडले.

शुभेच्छा.

जोडून, खोडून हे आणि असे इतर चालले असते का? शक्य तोवर वृत्त पाळण्यासाठी ह्रस्व-दीर्घाशी छेडछाड करू नये/होऊ नये असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.

रवानी गज़ल हा प्रकार आणि जो'डु'न, खो'डु'न यांचा काही परस्परसंबंध आहे का? या गज़लप्रकाराबद्दल सध्या तरी विशेष माहिती आणि अभ्यास नाही, मात्र जाणून घेण्यास आणि अभ्यासण्यास नक्कीच आवडेल.

(जिज्ञासू)चक्रपाणि