प्रत्येक माणसाच्या अंतरी ज्ञान असतेच. अभ्यासाने त्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करायचे असते. अभ्यासाचे / साधनांचे महत्त्व ह्याच साठी आहे.
अगदी पटले.
आपल्या कर्तेपणाचा अहंकार घालवून देवच कर्ता आहे हा भाव धरून जीवनांत जे घडते ते प्रसन्न मनाने स्वीकारणे आणि देवाचे स्मरण करत जीवन जगणे हे नामस्मरणात अपेक्षित आहे.
वरील वाक्य वाचताना त्याअगोदरील वाक्याचा संदर्भ अतिशय महत्त्वाचा आहे असे वाटते. नामस्मरण साधनेत जीवनाची संपूर्ण स्वीकृती अपेक्षित असते. सामान्यतः जीवनात घडणाऱ्या गोष्टींकडे ही 'जे होते ते भल्यासाठीच' या दृष्टीने पाहिल्यास मानसिक त्रास हा काही अंशाने का होईना कमी होतो. त्यामुळे जे काही होत आहे ते स्वीकारणे अर्थात आपल्याला जे काही करावेसे वाटते आणि शक्य आहे ते करीत राहावे. ते ही ईश्वर इच्छेनेच होत असते असे मला स्वतःला वाटते. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे ईश्वरी नियोजन असावे.
चु. भु. द्या. घ्या.
श्रावणी