मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.
भाषाश्रेष्ठतेचा वगैरे इथे मुद्दा नाही तर मराठी भाषा शिकणाऱ्या माझ्या तमिळ मैत्रिणींच्या मनात मराठीबद्दलही आदर निर्माण व्हावा म्हणून मी एक प्रयत्न करणार आहे इतकंच. मी मराठीची खूप काही थोर जाणकार वगैरे लागून गेलेली नाही, पण तरीही इतर स्त्रोतांपासून माहिती मिळवत असतानाच मनोगतवरूनही काही माहिती मिळाल्यास मला उपयोगी ठरेल, असं वाटलं म्हणून हा विषय मी इथे मांडला. मला स्वतःला तमिळच नाही तर सर्वच भाषांबद्दल आणि विशेषतः दाक्षिणात्य भाषांबद्दल जबरदस्त आकर्षण आहे.
उद्यापासून मी माझे प्रश्न मांडेनच इथे. उत्तरे मिळाली तर मदतच होईल आमच्या या हेल्दी भांडणाला !