अमेरिकेत आफ्रिकी वंशाचे असंख्य लोक आहेत. त्यातले अनेकजण जी (अतिभ्रष्ट इंग्लिश) बोली भाषा वापरतात त्याला एका स्वतंत्र भाषेचा दर्जा द्यावा असे काहींचे मत आहे.
एकूण या (आणि अश्या) भाषांचे स्वरूप आणि त्यात निर्माण झालेले साहित्य(...?) (कविता, महाकाव्ये, नाटके, कथा, कादंबऱ्या असतील असे वाटत नाही.) पाहता या 'भाषांना' प्रस्थापित म्हणता येईल असे वाटत नाही. इंग्लिश (अमेरिकी अथवा राणीची अथवा भारतीय) ही प्रस्थापित आहे तर वरील बोली भाषा नाही. अश्या भाषा वगळण्यासाठी 'प्रस्थापित' शब्द वापरला.
वरील प्रतिसादातील 'प्रस्थापित' हा शब्द मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकीय, पुणेरी, वऱ्हाडी, खानदेशी, सोलापुरी ह्या (आणि अश्या) किंवा इंग्लिश भाषेच्या अमेरिकी अथवा राणीची अथवा भारतीय ह्या (आणि अश्या) रूपांतला फरक दाखवण्यासाठी वापरण्यात आला नाही हेही नमूद करावेसे वाटते.