यावरून एक सरदारजीचा विनोद आठवला:
एकदा एक सरदारजी चेन्नईला जातो, आणि बसमध्ये बसतो. बराच वेळ जातो, आणि त्याच्या शेजारी बसलेल्या उतारूचे कुतूहल जागे होते (चेन्नईमध्ये फारसे सरदारजी दिसत नसावेत बहुधा, म्हणून की काय, कोण जाणे!), आणि त्याच्या मनात आपल्या सरदारजींशी गप्पा माराव्यात, असा एक विचार येतो. पण आपला सहउतारू चेन्नईकर ('मद्राशी' म्हणायचे नाही आता!) असल्याने त्याला हिंदी येत नसते / फक्त तमिळ येत असते, आणि सरदारजीला तमिळ कळते की नाही, कोण जाणे! तरी पण खडा टाकायचा, म्हणून तो सरदारजीला (तमिळमधून) विचारतो: 'तमिळ तिरिमा?' ('(तुला / तुम्हाला) तमिळ समजते का?') सरदारजीला समजत नाही (आणि बोलण्याचीही इच्छा नसते), म्हणून तो दुर्लक्ष करतो. सहउतारू पुन्हा विचारतो, "तमिळ तिरिमा?" सरदारजी पुन्हा दुर्लक्ष करतो. असे दोनतीनदा होते. बऱ्याचदा दुर्लक्ष केल्यावरसुद्धा हा पुन्हापुन्हा "तमिळ तिरिमा?" असे विचारतोय, म्हटल्यावर आपले सरदारजी शेवटी भडकून उत्तर देतात:
"अबे ओय, गल ठीक से सुन! तमिळ मेरी मॉँ, तो पंजाब तेरा बाप!"