माझा आक्षेप 'प्रत्येक (प्रस्थापित) भाषा आपल्या जागी श्रेष्ठ असते असे वाटते.' या आपल्या विधानातून 'म्हणजे अप्रस्थापित भाषा श्रेष्ठ नव्हेत' असा जो एक अर्थ अभिप्रेत होऊ शकतो (असे वाटते), त्याला होता.
आपल्या आक्षेपाचे नेमके उत्तर खालीलप्रमाणे-
सर्वच अप्रस्थापित भाषा श्रेष्ठ असतीलच असे वाटले नाही, म्हणून त्या भाषा मला माझ्या विधानातून वगळाव्यात असे वाटले.
===
अवांतर-
भाषा प्रस्थापित आहे का नाही हे ठरवण्याचे प्रस्थापित असे निकष आहेत का नाही ते माहीत नाही. पण प्रतिष्ठा आणि साहित्याबरोबरच इतरही अनेक गोष्टींचा त्या निकषांत विचार व्हावा/होत असावा असे वाटते. जसे की स्थानिक सरकारशी त्या भाषेत संपर्क साधता येऊ शकतो का? त्या भाषेतून खटले चालवले जातात का? खटल्यांचे निर्णय दिले जातात का? त्या भाषेचा समग्र शब्दसंग्रहात/कोषात किती शब्द आहेत? असा संग्रह आहे का? दुकानाच्या पाट्या त्या भाषेत असतात का?इ.इ.