आदरणीय भाषराव यांचा 'दुवादान पद्धत' हा लेख इथे चिकटवला आहे.
दुवा कसा द्यायचा हे तुम्हाला सांगू इच्छितो-
१. तुमच्या लिखाणात तुम्हाला दुवा (लिंक) द्यायचा असेल तो दुवा त्याजागेवरच्या पत्त्यावर जाऊन त्याची प्रत करा (कॉपी).
२. तुमच्या लिखाणात त्या दुव्याची प्रत चिकटवा (पेस्ट करा). ही अर्थात इंग्लिशमध्येच उमटेल.
३. लिखाणाच्या खिडकीवर असलेल्या खुणांच्या ठिकाणी एचटीएमएल फेरफार अशा खुणेवर निवडीची खूण करा.
४. ही खूण केल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही चिकटवलेल्या प्रतीचा खूप वेगळ्या स्वरूपात बदल झाला आहे. तो दुवा एकंदर दोनदा तिथे निर्माण झालेला दिसेल. त्यापैकी >***< अशा दोन चिह्नांमध्ये तुमचा दुवा तुम्हाला दिसेल, तो निवडून (सिलेक्ट करून) तो गाळून टाका (डिलिट करा).
५. त्या ठिकाणी तुमचा निर्देशक(कर्सर) असेल तिथे "इथे" किंवा "दुवा" किंवा तत्सम खुणेचा शब्द लिहा.
६. परत वरच्या खुणांतल्या "एचटीएमएल फेरफार" अशा खुणेवरील निवडीची खूण रद्द करा. असे केल्याबरोबर मगाशी निर्माण झालेला फरक जाऊन *** ऐवजी आता फक्त तिथे तुम्ही लिहिलेला "इथे" वा "दुवा" किंवा तत्सम शब्द दिसेल.
७. बाकीचे लिखाण पुरे करून नेहमी प्रमाणे सुपूर्त करा. आता त्या लिखाणात फक्त तुमचा लिहिलेला शब्द येऊन त्याला दुव्याचे स्वरूप येईल हे फार अवघड नाही एक-दोन वेळा वापरले की सहज जमून जाईल.
अधिक माहितीसाठी तांत्रिक माहिती हा लेख वाचावा.