ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान ह्या त्रिपुटीचा नाश होणे म्हणजे नक्की काय ?
ज्ञात्याचा नाश होणे ठीक आहे परंतु ज्ञानाचा नाश ?

कोणतेही ज्ञान हे त्यास मिळवणारा जो ज्ञाता त्यास होत असते. द्वैतबुद्धीने-म्हणजे ज्ञाता व ज्ञेय यांच्या वेगळेपणाने-संपादन केलेल्या ज्ञानाने भगवंताचे ज्ञान होणार नाही.

ज्ञान संपादन करणारा ज्ञाताच जर नाहीसा झाला तर त्या ज्ञानाला आश्रय उरणार नाही. आत्मज्ञानात ज्ञान-संपादनाच्या प्रक्रियेत ज्ञाताच ज्ञानामध्ये विलीन होतो. ज्ञाता ज्ञानमयच होऊन जातो. म्हणून तर हे ज्ञान 'गूढ' आहे असे म्हटले आहे. ज्ञाता संपतो तेंव्हाच त्या ज्ञानाचा उदय होतो.

त्रिपुटीचा नाश होतो असे म्हटले आहे. ज्ञानाचा नाही.