१. असा नियम असल्याची माहिती १.५-२ वर्षांपूर्वी माझ्या पूर्वीच्या कंपनीच्या नावाची पाटी मराठी+इंग्लिश अशी बदलण्यात आली तेव्हाच कळली.

२. या संस्थेबद्दल कल्पना नाही.

३. होय. माझ्या सध्याच्या कंपनीची पाटी नुकतीच म्हणजे साधारण १-२ महिन्यापूर्वी मराठी मधे झळकली गेली तेव्हा पाहिली.  

दंड केला हे बरेच झाले. ह्या नियमाचे स्वागत आहे. मुंबईत काही ठिकाणी द. भारतीय+इंग्लिश भाषेतील पाट्या पाहिल्या आहेत. ते पाहून खरंच आश्चर्य वाटले की आपण महाराष्ट्रात राहतो की द. भारतीय राज्यात ??