दुर्दैवाने मुंबईत पूर्वी अशी सक्ती केल्यानंतर नावापुरते पत्र्याचे गरीब दिसणारे सुमार फ़लक मराठीत लावले गेले वा छोट्या पाट्या मराठीत लागल्या मात्र सुशोभित वा झगमगणारे विद्युत-नलिका फ़लक मात्र इंग्रजीतच राहिले.
बहुधा तेव्हा फ़क्त मराठी फ़लकाची सक्ति होती, आकाराचे बंधन नव्हते.
सगळ्यात वाईट असे की हे फलक लागण्यामागे सेनेचा दंडुका हेच मुख्य कारण असूनही तथाकथीत लब्धप्रतिष्ठीतांनी दुकानदारांना खडसावण्या ऐवजी सेनेचा निषेध करण्यात धन्यता मानली होती. जो पर्यंत प्रत्येक मराठी माणूस 'आधी मराठी अस्मिता' मग इतर उपचार अशी ठाम भूमिका सर्व स्तरांतून घेत नाही तोपर्यंत मराठीला प्रतिष्ठा येणार नाही.