पण पुढचा लेख पुढच्या वर्षी लिहू नकोस म्हणजे झाले ! या लेखांद्वारे सर्वांच्या माहितीत/ज्ञानात भर घालण्याच्या तुझ्या उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.

..(मी भाषाशास्त्र - संस्कृत या संबंधांबद्दल जितकं वाचलंय तितकं इतर भाषांबद्दल वाचलेलं नाही आणि भाषाशास्त्राचा जन्मच संस्कृतभाषेमुळे झाला हे अभिमानाने सांगावंसं वाटतं या गोष्टी डिस्क्लेमर बरं का !)

हे लपून-छपून न लिहिता ठळक लिहिलेस तरी चालेल. कारण जे लोक हे वाचणार नाहीत त्यांना 'हे सगळं इथे सांगण्याचं कारण म्हणजे भाषाशास्त्राचा संस्कृत भाषेशी असलेला संबंध, संस्कृत भाषेची ज्ञानसंवर्धनाची तळमळ, आणि आहे ते ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी संस्कृत भाषेच्या स्वरूपात झालेला बदल या सर्व गोष्टींचा परस्परसंबंध आणि त्याचं महत्त्व एकदा अधोरेखित करायचं आहे. ' या  तुझ्या म्हणण्याचा अर्थ आणि लेखाशी असलेला संबंध कळणार नाहीत.