मनकवडे महाशय

आपण टोकाची भूमिका घेत आहात. मराठी पाट्या लावा असा आग्रह आहे व नियम आहे, इतर भाषेतील पाट्या लावू नका असा कायदा केलेला नाही व कुणी करणारही नाही. ज्यांना इतर भाषेतील पाट्या लावताना मराठी पाट्या लावाची अडचण होते त्यांच्या साठी हा नियम आहे. सर्वांना समजण्यासाठी इंग्रजी पाट्या लावाच्या तर ज्या मराठी लोकांना इंग्रजी येत नाही त्यांनी काय करावे? यासाठी मराठी आवश्यकच आहे, मग इतर भाषेतील हव्या तितक्या पाट्या लावा.

<जाता जाता...माझे काही मित्र बेंगरूळू येथे गेल्या ६-७ वर्षांपासून काम करतात पण त्यांना काडीइतकेही कानडी येत नाही. मात्र त्यांची अपेक्षा असते की पुण्यात शिकणाऱ्या इतर राज्यातील लोकांनी मराठी शिकावी.>

साहेब, बंगळूरात कधी पोलीस स्थानकात तक्रार करायचा प्रसंग आला आहे का आपल्या मित्रांवर? ती कानडीतच लिहीली जाते. मग महाराष्ट्रात मराठीतून लिहीली गेली तर गैर काय?

सर्वांची सोय आपणच फ़क्त का बघायची? जर सर्व भाषीक राज्ये आपली स्वतःची व किमान दोन इतर भाषा अशा तीन भाषांना मान्यता देतील तर उत्तम. चेन्नै मध्ये हिंदी भाषीकाला कुणीही दाद देत नाही मात्र हेच मद्राशी मुंबईत उतरले की हिंदी बोलतात.

आपण मराठीत बोलतो हा गुन्हा आहे हा न्यूनगंड कशासाठी? आणि ही जर सहिष्णुता म्हणाल तर ती मराठी माणसानेच का दाखवावी?