महाराष्ट्रात मराठी पाट्या लिहिण्यासाठी 'नियम आणि दंड' करावा लागतो ही आमची (आपली ?) अधोगती आहे !!!
तुम्ही मुळचे खेड्यातले ना ?? मग हाच विचार करून, जेव्हा महाराष्ट्रातील खेड्यातले , इंग्लिश चा गंध नसणारे लोक महाराष्ट्रातल्याच शहरात जातात तेव्हा त्यांनी इंग्लिश पाट्या बघून काय करावे ?? की आता उच्च शिक्षणाने, परदेशात राहून आपल्याला खेड्यांची पर्वा वाटेनाशी झाली आहे ?? इथे मुंबईमधे बंगाली, उडिया, पंजाबी, मणिपुरी, काश्मिरी, राजस्थानी, गुजराती, नेपाळी, रशियन, जपानी, चिनी, आफ्रिकन वगैरे वेगवेगळ्या ठिकाणाची लोक राहतात/येतात आणि सर्वांनाच इंग्लिश येते असे नाही तेव्हा आम्ही त्यांच्या सोयीसाठी प्रत्येक भाषेतील एक पाटी लावावी काय ?? सहलीसाठी/काही कामानिमित्त येणारे लोक तिथे कायमसाठी येत नाहीत, त्यामुळे केवळ त्यांच्या सोयीसाठी आपण आपली भाषा सोडून इतर भाषांत पाट्या लावणे हा कुठल्या न्याय ?? शिवाय जेव्हा कोणी परप्रांतात सहलीसाठी जातो, तेव्हा त्याने तिथली कामचलाऊ भाषा शिकून घेणे श्रेयस्कर नाही का ??
आपण ज्या इस्पितळात काम करता तेथील पाट्या भारतीय भाषांत आहेत म्हणून इंग्लडातल्या सगळ्या पाट्या इतर भाषांत आहेत काय ?? आणि तसे करणे म्हणजे स्थानिक लोकांवर आणि स्थानिक भाषेवर अन्याय नाही का ??
आणि अपेक्षांचे म्हणायचे झाल्यास मराठी माणसाइतका दुसऱ्यासमोर वाकणारा प्राणी दुसरा कोणीही नसेल. आमच्याकडे इतरभाषिक लोक आले तर संवाद घडावा म्हणून आम्ही आधी हिंदी/इंग्रजी चा आधार घेतो. तुमच्या मित्रांशी जर तिथे हिंदी/इंग्रजीतून संवाद साधला जात नसेल तर मग त्यांनी द. भारतीयांकडून तशी अपेक्षा(महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी) ठेवली तर चुकले कुठे ?? तिथे कामवाली बाई, भाजीवला, दूधवाला हिंदी/इंग्रजी वापरतात ??? पण आमच्याकडे मात्र हे लोक मोडक्या-तोडक्या हिंदीत बोलायचा प्रयत्न करतात.
महाराष्ट्रात उर्दू , कानडी माध्यमाच्या शाळा असतात आणि इंग्लिश शाळात मराठी विषय ऑप्शनल ???
तुमच्या सारख्या विचारांचे लोकच मराठी रसातळास जाण्यास कारणीभूत आहेत यात शंकाच नाही.