गायत्री,
प्रतिसादाबद्दल धन्यावाद!
तुमच्या प्रश्नांची उत्तरे :
१. पॉयरॉने असा अंदाज केला तो त्याच्या मनुष्यस्वभावाच्या सूक्ष्म अभ्यासातून. लॉर्ड मेफील्ड आराखड्यांची मूळ प्रत 'त्या' देशाकडे देणाऱ्यातले नाहीत हे त्याला माहीत होतं. त्यांच्या ह्या स्वभावामुळेच तो त्यांच्याबद्दल असं म्हणतो की -
'तुम्ही स्वत: एक प्रामणिक व्यक्ती आहात म्हणून कोणा निरपराध माणसावर संशय जाऊ न देण्याची तुमची धडपड समजण्यासारखी आहे.'
२. हा अंदाज खरा आहे हे तर खुद्द मेफील्डच मान्य करतात.
(कथेचा हा शेवट 'इन्क्रेडिबल थेफ्ट' मधला आहे, तर उर्वरित कथा 'सबमरीन प्लॅन्स'वर आधारित आहे, त्यामुळे हा अंदाज खरा ठरल्याचा उल्लेख यात नाही :) )
अमित