महाराष्ट्रात मराठी पाट्या लिहिण्यासाठी 'नियम आणि दंड' करावा लागतो ही आमची (आपली ?) अधोगती आहे !!!
हो. ही आपली अधोगती आहे. अमृतातेही पैजा जिंकी अशा भाषेला व केवळ तीन चारशे वर्षांपूर्वी ज्यांचे भारतावर राज्या होते अशा राष्ट्राला "नियम व दंड" यांचा आधार घ्यावा लागतो ही नामुष्कीची गोष्ट आहे म्हणजेच अधोगती आहे.
तुम्ही मूळचे खेड्यातले ना ?? ......
या परिच्छेदावर दोन मुद्दे.
सर्वसाक्षी यांनी स्पष्ट करून सांगितल्याप्रमाणे मुद्दा मराठी मध्ये पाट्या लावण्याबद्दल आहे. मी माझ्या प्रतिसादात महाराष्ट्रामध्ये मराठी मध्ये पाट्या लावू नये असे लिहिल्याचे आठवत नाही म्हणजेच आपला खालील मुद्दा हा निरर्थक व भावनेच्या भरात लिहिलेला वाटतो
(मग हाच विचार करून, जेव्हा महाराष्ट्रातील खेड्यातले , इंग्लिश चा गंध नसणारे लोक महाराष्ट्रातल्याच शहरात जातात तेंव्हा त्यांनी इंग्लिश पाट्या बघून काय करावे ?? की आता उच्च शिक्षणाने, परदेशात राहून आपल्याला खेड्यांची पर्वा वाटेनाशी झाली आहे ??)
मुद्दा क्रमांक दोन
आपल्या भाषेबद्दल इतरांनाही प्रेम वाटावे यासाठी इतर भाषांचा तिरस्कार करण्याऐवजी आदर करणे हे जास्त संयुक्तिक वाटते. पेराल तसे उगवेल. मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा जगाच्या पाठीवर शिवसेनेने केलेला ऱ्हास समजून घेण्यास स्वतंत्र भारतातील मुंबई येथे भितीने वावरणाऱ्या सामान्य परप्रांतीयांशी बोलावे....( मराठी भाषिकास बेळगाव मध्ये कन्नड भाषेचा व संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्यांबद्दल काय वाटते हेही बघावे)
आणि अपेक्षांचे म्हणायचे झाल्यास मराठी माणसाइतका दुसऱ्यासमोर वाकणारा प्राणी दुसरा कोणीही नसेल. आमच्याकडे इतरभाषिक लोक आले तर संवाद घडावा म्हणून आम्ही आधी हिंदी/इंग्रजी चा आधार घेतो.
हा एक सामान्य गैरसमज आहे. मराठी माती आणि संस्कृती ही पुरेशी समृद्ध असल्याने मराठी माणसास देशोदेशी पोटासाठी जाण्याची गरज फार कमी भासली आहे. याचे उदाहरण म्हणजे जगाच्या पाठीवर गुजराती, शीख, तमिळ, बिहारी, मल्याळी कित्येक दशकांपासून विखुरलेल्या आहेत. तसेच भारतामध्ये इतर राज्यात विविध व्यवसायांसाठी उत्तर व दक्षिण भारतीय लोक स्थलांतरित झालेले आहेत.
यांउलट आपण स्वतःच्या राज्यात सुख समृद्ध असल्याने शतकांपूर्वीपासुन देशाटन कमी प्रमाणात केले. त्यामुळे एकंदरीत आपली इतर संस्कृतींबद्दलची सहनशीलता कमी पडते. (हा मुद्दा खोडायचा असल्यास तुलनात्मक उदाहरणे द्यावी)
हिंदी
हिंदी ही राष्ट्रीय भाषा, हा राजकीय विषय आहे. दक्षिण भारताने ते मान्य केल्याचे माझ्या वाचण्यात नाही.
महाराष्ट्रात उर्दू , कानडी माध्यमाच्या शाळा असतात आणि इंग्लिश शाळांत मराठी विषय ऑप्शनल ???
शाळेत शिकवल्याने भाषा टिकतात व न शिकविल्यास त्यांचा ऱ्हास होतो हा भ्रम आहे. भाषांची लोकप्रियता वाढण्यास पूरक गोष्टी
सत्ता वादातीत सत्ताधाऱ्यांची भाषा.
पैसा जी भाषा शिकल्यावर पोट भरते ती भाषा तग धरते. यात शिक्षण नोकरी, व्यवसाय ,ज्ञान सर्व येते. याची दोन उदाहरणे म्हणजे इंग्रजी शिकणाऱ्या चिन्यांची वाढलेली संख्या व जपानी शिकणाऱ्या इंग्रजांची वाढलेली संख्या.
प्रसिद्धी टुरिझम, ऐतिहासिक स्थळांना प्रसिद्धी इत्यादी.
संस्कृती संस्कृतीचे दाखले देण्यासाठी वापरली जाणारी भाषा.
वरील गोष्टींची दखल घेऊन जर आपण राज्याच्या पॉलिसीज बनविल्या तर भविष्यकाल उज्ज्वल असायला हरकत नाही.
तुमच्या सारख्या विचारांचे लोकच मराठी रसातळास जाण्यास कारणीभूत आहेत यात शंकाच नाही.
आपणास असे वाटावे याबद्दल मला खेद वाटतो.
- मनकवडा