* किंबहुना मराठीतील 'च्यायला' ही शिवी खरे तर त्याहूनही भयंकर आहे. अतिवापरामुळे आपल्याला तिचा अर्थ लक्षात येत नाही, आणि कदाचित म्हणूनच ती इतकी रुळली आहे, की तिचा फारसा विचार न करता सर्रास वापर केला जातो. (याला अस्मादिकही अपवाद नाहीत, हे येथे कबूल करणे प्राप्त आहे.) परंतु 'च्यायला' हा शब्द नसून पूर्ण वाक्य आहे, ज्यातील क्रियापद हे अध्याहृत आहे, हे लक्षात घेता, ती मराठीतली बहुधा सर्वाधिक भयंकर शिवी असावी. पण लक्षात कोण घेतो?

प्रत्येक बोलीभाषेत कित्येक शब्द सहजगत्या वापरले जातात ज्यांचा खरा अर्थ अत्यंत भयानक निघू शकेल....
"सगावाला" ह्या शब्दाचे गुजराथीत दोन अर्थ निघतात -
१- नातेवाईक    २-मित्र 
मग एखाद्या गुजराती मुलीला विचारा - 'बाजूला उभा असलेला तुझा सगावाला आहे का?' - तिने भडकून चप्पल नाही मारली तर समजावे - हिचे गुजराथी कच्चे आहे !
कारण सगावाला ह्या शब्दाचा अर्थ 'अवैध नातेसंबंध ठेवलेला माणूस' हाही होऊ शकतो-
'**त्या' हे मराठीतले विशेषण 'अत्यंत महामूर्ख माणूस' ह्या अर्थाने बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकले आहे (मुंबईत तरी) परंतू त्याच्या खरा अर्थ काढायचा झाल्यास ती अत्यंत अश्लील शीवी आहे -