प्रत्येक बोलीभाषेत कित्येक शब्द सहजगत्या वापरले जातात ज्यांचा खरा अर्थ अत्यंत भयानक निघू शकेल....
मान्य. "च्यायला"चे असेच काहीसे झाले आहे. खरा अर्थ भयंकर असूनही त्याचे कोणालाच फारसे तर सोडाच, काहीच वाटत नाही, अशी स्थिती आहे.
मात्र 'त्या' तमिळ शिवीचे तसे नाही, आणि ती वापरण्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात, हा महत्त्वाचा मुद्दा दृष्टीस आणून द्यावासा वाटतो. विद्यार्थि/तरुणवर्गात (विशेषतः चांगली जानपहेचान असेल तर) ही शिवी प्रचलित आहे खरी, परंतु इतर सर्व परिस्थितीत वापरल्यामुळे एखाद्यावर/एखादीवर प्रसंगी मार खाण्याची वेळ आल्यास त्यात कोणास आश्चर्य वाटण्याचे कारण नसावे, हेही नमूद करावेसे वाटते. तेव्हा जपून!
- टग्या