'आहे. मी माझ्या प्रतिसादात महाराष्ट्रामध्ये मराठी मध्ये पाट्या लावू नये असे लिहिल्याचे आठवत नाही म्हणजेच आपला खालील मुद्दा हा निरर्थक व भावनेच्या भरात लिहिलेला वाटतो
आपल्या प्रतिसादात आपण 'मराठी मधे पाट्या लिहिण्याच्या सक्तीबद्दल वाईट वाटते' असे लिहिलेत ! आणि त्याचे कारण म्हणून आपली म्हैसूर सहलीची कथा सांगितलीत !! आणि वानगीदाखल तुमच्या प्रतिष्ठित इस्पितळातील भारतीय भाषिक पाट्यांची माहिती सांगितलीत. वरील लेखात असे कुठेही म्हटले नव्हते, जे सर्वसाक्षींनीही स्पष्ट केलेच आहे, की पाट्या 'फक्त' मराठीत लिहिण्याची सक्ती केली आहे ! तुम्हाला शिवसेनेच्या दगडफेकीबद्दल वाईट वाटले असते तर गोष्ट वेगळी होती. त्यामुळे तुमचा हा प्रतिसाद केवळ सारवासारव करण्यासारखा आहे !
करणे हे जास्त संयुक्तिक वाटते. पेराल तसे उगवेल. मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा जगाच्या पाठीवर शिवसेनेने केलेला ऱ्हास समजून घेण्यास स्वतंत्र भारतातील मुंबई येथे भितीने वावरणाऱ्या सामान्य परप्रांतीयांशी बोलावे....( मराठी भाषिकास बेळगाव मध्ये कन्नड भाषेचा व
इथे केवळ शिवसेनेवर खापर फोडून आपण मोकळे होत आहात ! तुमच्या-आमच्यासकट सर्वसामान्य माणूसही मराठीच्या ऱ्हासास कारणीभूत आहे. मुंबईत कोणी परभाषिक भीतीखाली वावरत असल्याचे जे सांगितलेत ते 'हास्यास्पद' आहे ! काही लोक (त्यात अगदी मराठी लोकही आहेत) असतीलही. पण जर सगळेच परप्रांतीय शिवसेनेच्या भीतीखाली/दडपणाखाली वावरत असते तर इतक्या वर्षांचा बालेकिल्ला शिवसेना इतक्या सहजासहजी हरली नसती. शिवसेनेविरुद्ध मत द्यायला 'परप्रांतीय' तयार झाले नसते !! की काँग्रेसवाल्यांनी प्रत्येक मुंबईकराला झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे ??
कर्नाटक सरकारची तुलना आपण शिवसेनेशी का करत नाही ?? महाराष्ट्रात शिवसेना गुंडगिरी करत असेल तर कर्नाटक सरकार बेळगावात काही वेगळे करत नाही. शिवाय आपला मुद्दा 'महाराष्ट्रात मराठी' पाट्यांचा आहे. आणि असा नियम केल्याचे 'तुम्हाला वाईट वाटले'. आपण बेळगाव(जरी मराठी असले), जे सध्या 'कर्नाटकात' आहे त्याचा मुद्दा उपस्थित करून चर्चेला फाटे फोडण्याचे कारण समजले नाही. आपण येथे बेळगाव सीमाप्रश्नाबद्दल बोलत नाही. आपल्याला वाटल्यास आपण वेगळी चर्चा चालू करू शकता.
कोणीही नसेल. आमच्याकडे इतरभाषिक लोक आले तर संवाद घडावा म्हणून आम्ही आधी हिंदी/इंग्रजी चा आधार घेतो.
या माझ्या मुद्द्यावरील आपले उत्तर अजिबात संलग्न नाही. ही सत्यपरिस्थिती आहे की नाही याचे उत्तर आपण द्यावे. याचाच अर्थ आपण कोणावरही मराठीत बोलण्याची सक्ती करत नाही. पण आपण परप्रांतात विशेष करून द. भारतात गेलो तर आपल्याशी कोणी मराठीत/हिंदीत बोलायचा प्रयत्न केला आहे का ?? महाराष्ट्रातील सुखसमृद्धीबद्दल बोलाल तर आपले म्हणणे १००% बरोबर आहे.
त्यामुळे एकंदरीत आपली इतर संस्कृतींबद्दलची सहनशीलता कमी पडते. (हा मुद्दा खोडायचा असल्यास तुलनात्मक उदाहरणे द्यावी)
इथे हे 'केवळ' मराठी लोकांचे वैशिष्ट्य आहे असा सरळसरळ अर्थ निघतो. आपली सहनशीलता कमी पडत असती तर वर्षानुवर्ष मुंबईत मराठी + परप्रांतीय नांदू शकले नसते. बिहारमधे प्रत्यक्ष बिहारीही सुखाने/सुरक्षित राहू शकत नाहीत. बाकीचे लोक काय राहणार ?? बिहारी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातही राहतात ! उ. भारतात जेव्हा मराठी माणूस हिंदी बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची खिल्ली उडविली जाते. इथे मुंबईत सर्वप्रांतीय लोक वेगळीच मराठी-हिंदी मिश्रीत भाषा बोलतात आणि त्यावर कोणी इथे हसत नाही. पण आपल्या म्हणण्यानुसार याचे श्रेयही आपण परप्रांतीयांनाच द्यायला हवे नाही का ?
सहनशक्तीबद्दल आपले म्हणणे बरोबर आहे. आपली सहनशक्ती २ जातींमधेही कमी पडते परप्रांतीय संस्कृतीचे काय घेऊन बसलात !! त्यामुळे आपली म्हणजे 'केवळ' मराठी लोकांची सहनशक्तीच कमी पडते असे म्हणणे अन्यायकारक आहे !! हे जगाच्या पाठीवर कुठेही बघायला मिळेल.
आपण तुमच्यासाठे मराठी-गुजराती अशी तुलना करूया. मराठी माणूस अमेरिकेत गेला, व्यवसाय चालू केला पण अमेरिकेत मिसळून गेला. तिथे मराठी पाट्या लावल्या नाहीत. तुमच्या इंग्लंडात गेला तरीही मिसळला. तिथेही मराठी पाट्या नाहीत. फार लांब नको. भारतातच द. भारतात गेला पण मराठी पाट्या नाहीत. एखाद-दुसरा अपवाद असेलही. पण गुजराती लोक ? जिथे कुठे जातील तिथे गुजराती 'भाषा' घेऊन जातात ! हीच गोष्ट पंजाब्यांची. यावरून 'मराठी माणूस त्या त्या ठिकाणच्या संस्कृतीत मिसळून जातो' असा आपण असा निष्कर्ष काढला तर ते चुकीचे आहे काय ??
हिंदी ही राष्ट्रीय भाषा, हा राजकीय विषय आहे. दक्षिण भारताने ते मान्य केल्याचे माझ्या वाचण्यात नाही.
या बद्दल आपल्याला काहीच आक्षेप नसावा याचे आश्चर्य वाटते !!! शिवाय हिंदी राष्ट्रीय भाषा आहे तशीच मराठी, गुजराती, कानडी, तमिळ इत्यादी सर्वच्या सर्व 'राज्यभाषा' राष्ट्रीय तसेच 'ऑफिशियल' (शब्द ??) भाषा आहेत. संदर्भ इथे पहावा.
पण शाळेत केवळ 'हिंदीच' 'राष्ट्रीय' भाषा असल्याचे शिकविले जाते. हिंदी ही केंद्र सरकारचे कामकाज चालविण्यासाठी निवडलेली भाषा असली तरी इतर कोणतीही भाषा वापरू नये असे नाही. त्यामुळेच द. भारतात हिंदी शिकविण्याची कोणी सक्तीही करू शकत नाही. त्यांचे सर्व कामकाज त्यांच्या भाषेतून चालते. पण आपल्याकडे मराठीतून कामकाज चालू शकत नाही. इतकेच काय मनोगती 'प्रसाद शिरगांवकर' यांचा 'मराठीतून सहीचा' अनुभव नक्की वाचा ! आमच्या शाळांत हिंदीची सक्ती आहे. शहरात तरी ठिक आहे की इतरभाषिकांशी बोलण्यासाठी हिंदीचा उपयोग होतो. पण स्थानिक भाषा वेगळी असताना शालेय अभ्यासक्रमात 'सक्तीने' हिंदी घालण्याचे प्रयोजन काय ? ज्या लोकांना चित्रपट/टी. वी. पाहण्याव्यतिरिक्त हिंदीचा उपयोग होत नसेल, ज्यांचे रोजचे व्यवहार स्थानिक भाषेतून होतात त्यांनी ३/६ वर्षे 'सक्तीने' हिंदी भाषा का शिकावी ??
भाषा टिकतात व न शिकविल्यास त्यांचा ऱ्हास होतो हा भ्रम आहे. भाषांची लोकप्रियता वाढण्यास पूरक गोष्टी
सत्ता वादातीत सत्ताधाऱ्यांची भाषा.
पैसा जी भाषा शिकल्यावर पोट भरते ती भाषा तग धरते. यात शिक्षण नोकरी, व्यवसाय ,ज्ञान सर्व येते. याची दोन उदाहरणे म्हणजे इंग्रजी शिकणाऱ्या चिन्यांची वाढलेली संख्या व जपानी शिकणाऱ्या इंग्रजांची वाढलेली संख्या.
प्रसिद्धी टुरिझम, ऐतिहासिक स्थळांना प्रसिद्धी इत्यादी.
संस्कृती संस्कृतीचे दाखले देण्यासाठी वापरली जाणारी भाषा.
सत्ता - महाराष्ट्रात सत्ताधारी मराठीच आहेत.
पैसा - हिंदी न शिकताही केवळ इंग्लिश आणि स्थानिक भाषेवर स्थानिक पोट भरतात. म्हणून त्यांनी त्यांच्याइथल्या पाट्या स्थानिक भाषेतून काढून हिंदीमधे केलेल्या नाहीत. चिनी जरी इंग्रजी शिकले तरी तिथे चिनीतूनच व्यवहार होतात आणि होत राहतील. आणि शिकलेले नसतानाही त्यांच्यासाठी 'चिनी'/जपानी ऑपरेटिंग सिस्टीम उपलब्ध होती आणि आहे. जपान मधे अजूनही इंग्लिश भाषा शाळेत सरसकट शिकविली जात नाही आणि तिथल्या 'सर्वसाधारण' पाट्याही अजूनही जपानीतच आहेत.
प्रसिद्धी - तसे बघितले तर सध्या जास्तीत जास्त भारतीय पर्यटक गुजराती/पंजाबी असतात. पर्यटकांच्या सोयीसाठी त्यांच्या भाषेत पाट्या लिहिल्याचे ऐकले/पाहिले नाही. महाबळेश्वरची गोष्ट सोडा. ते मराठी गाव असल्याने त्यांनी तसे करायलाच पाहिजे !!
जपानची राजधानी 'तोक्यो' (Tokyo) येथील नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका खिडकीबाहेर 'मला जपानी व्यतिरिक्त कुठलीही भाषा येत नाही. कृपया इंग्लिश मधून प्रश्न विचारू नयेत' अशा आशयाची कळकळीची विनंती लिहिली आहे. म्हणून नारिता मधी उतरणारे प्रवासी कमी झाले नाहीत. आपण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो त्यावेळी तिथली भाषा थोड्याफार प्रमाणात शिकून घेणे कधीही श्रेयस्कर
संस्कृती - महाराष्ट्रातील संस्कृती मराठमोळी असल्याने, दाखले देण्यासाठी अन्य भाषांची गरज पडावी यासारखी नामुष्की दुसरी नाही !
वरील गोष्टींची दखल घेऊन सरकारने 'महाराष्ट्रात मराठीमधे पाट्या लिहिण्याची सक्ती' केली होती. १.५-२ वर्षांपूर्वीच अशी सक्ती केलेली असूनही लोक जर त्या 'नियमाचे पालन करत नसतील' तर दंडुकेशाही वापरून लोकांना ताळ्यावर आणणे गरजेचे आहे. याचा अर्थ मी शिवसेनेच्या कृतीचे समर्थन करत नाही. पण बऱ्याच वेळा श्री समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे
ठकाशी असावे ठक
उद्धटाशी उद्धट
नटखटाशी नटखट
झालेचि पाहिजे !
ज्या भाषेचा तुमचा काही संबंध आला नाही त्या भाषेविषयी गोडी तुम्हाला का वाटेल ? संस्कृत शिकल्यामुळे त्याविषयी गोडी/आस्था वाटते. जी भाषा शाळेत शिकविली जाणार नाही ती भाषा शिकावी असे 'सर्वसाधारण' लोकांना वाटत नाही. आणि ते चुकीचे आहे असेही नाही. मराठी माध्यमाच्या शाळांत पहिलीपासून इंग्लिश आणि इंग्लिश शाळांत मराठी 'ऑप्शनल' ठेवून आपण समाजात मराठी निरुपयोगी/ कुचकामी असल्याचा संदेश देत नाही का ?? जरी हे मराठी लोक इंग्लिश मधे शिकले तरी जरा खरचटले तर तोंडातून 'आई गं' हेच बाहेर पडणार आहे. गुजराती /कानडी लोक त्यांच्या माध्यमाच्या शाळा इतर प्रांतात चालवून त्यांच्या भाषेचा मान राखतात तर मराठी लोकांनी निदान महाराष्ट्रात असे केले तर काय घोर अपराध केला आहे ??
मूल वाढताना त्याच्या विचारांची बैठक शालेय शिक्षणातून तयार होते. त्यामुळे भाषा टिकतात व न शिकविल्यास त्यांचा ऱ्हास होतो हा भ्रम आहे. हा तुमचाच 'गैरसमज' आहे. उदा. द्यायचे झाले तर जिच्या वाड-वडिलांच्या पिढ्यान-पिढ्या पुण्यात गेल्या अशा माझ्या एका गुजराती मैत्रिणीला गुजराती भाषेचे एक अक्षरही येत नाही. शाळेत इंग्लिश, घरा-दारात मराठी शिकल्याने अशा लोकांच्या बाबतीत गुजरातीचा ऱ्हास झाला असे म्हणणे चुकीचे आहे का ???? आणि तसे होणे फारसे चुकीचे आहे असे मला वाटत नाही. जिथे आपण राहतो ती भाषा आपल्याला येणे आवश्यक आहे. इथे तर आपण 'महाराष्ट्रातील मराठी' बद्दल बोलत आहोत.
आपल्या मूळ प्रतिसादात आपला रोख 'विनाकारण' मराठी विरोधी असल्याने माझे आपल्याबद्दलचे मत अजूनही तेच आहे !