१)शिवधर्म हा मातृपुजक धर्म आहे,त्यामुळे यात स्त्रियांना मानाचे स्थान राहील यात शंका घेण्याचे कारण नाही.

२)धर्म आला म्हणजे देव आलाच या आपल्या विधानाशी मी सहमत नाही.बौद्ध धर्म देव मानत नाही‌. शिवधर्मात देवांना स्थान नाही पण आम्ही राष्ट्रमाता जिजाऊना सर्वोच्च स्थानी मानतो.महात्मा फुल्यांप्रमाणे निर्मिकाची कल्पनाही आम्हाला मान्य आहे.

३)विठ्ठ्लाला आमचा विरोध नाही कारण ती महाराष्ट्रातील बहुजन समाजाची देवता आहे.तिथे जातीभेद नाही.विठोबा जसा ज्ञानेश्वरांचा आहे तसा तो चोखाचाही आही.पण विठ्ठलाच्या बडव्यांना मात्र आमचा विरोध आहे.(देव आणि माणूस यांत दलाल नको)

४) संत ज्ञानेश्वर आम्हा सर्वांनाच वंदनीय आहेत,त्यांना आमचा विरोध असूच शकत नाही.आमचा विरोध त्यांना आहे जे फ़क्त सोयिस्कर संतांनाच मोठं करतात आणि इतरांना अनुल्लेखाने मारतात. संत ज्ञानेश्वर, रामदास आणि एकनाथ हे सोडून इतरही संत महाराष्ट्रात आहेत.

४)तेरवी ई. संस्कारांना शिवधर्मातून पुर्ण फाटा देण्यात आला आहे.पण नामकरणासारखे संस्कार आवश्यक आहेत,त्यांच्यासाठी ब्राह्मणांची किंवा त्यासदृश कुणाचीही आवश्यकता नाही.

५)शिवधर्मात आल्यानंतर जर कुण्या कुणाला जर आंतरजातीय विवाह करावयाचा असेल तर त्यांना प्रोत्साहनच दिल्या जाईल,पण कुणी आंतर्जातीय विवाहच करावा अशी जबरदस्ती आम्ही कशी करू शकतो.

६) फ़क्त ब्राह्मण विरोध हा आमचा हेतू कधीच नव्हता अणि नाही. शिवधर्मात आलेले सर्व लोक एका विचाधारेने आलेले आहेत.मुळात कुणाचा विरोध हा हेतुच नव्हता,पण लेन सारख्या कटकारास्थान्यांना सामील असणारे ब्राह्माणच असावेत हा काय आमचा दोष आहे?

७)वैयक्तिक माझं म्हणाल तर मी काही महिन्यांअगोदर एक अतिशय हिंदुत्ववादी वगैरे विचारांचा माणूस होतो,पण जसजसे डोळे उघडायला लागले, मी मनाने शिवधर्मी झालो.

७)ब्राह्मणांना आमचा विरोध होत आहे हे मंजूर आहे,त्याचं करण असं की आम्ही त्यांना ज्ञानशत्रू मानतो. पिढ्यान पिढ्या पासून जो वर्ग बहुजन समाजापासून ज्ञान लपवून ठेवत आहे त्यांना ज्ञानशत्रू म्हणावे नाही तर काय?

८)बहुजन वर्ग मागासलेला असण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे विद्येचा अभाव , आणि याला कारण ब्राह्मण ! जेव्हा आम्ही त्यांच्या पुढारलेल्यापणाचा आणि आमच्या मागासलेपणाचा विचार करतो तेव्हा विचार येतो तेव्हा लक्षात येतं की आमचा शिक्षणाशी संबंध फ़क्त गेल्या दोन-तीन पिढ्यांचा आहे,आणि ते युगांपासून ज्ञान इतरांपासून लपवून स्वतःच खात आहेत,अणि आता आम्हाला आता त्यात वाटा हवा आहे.

९)हा वाटा आम्हाला देण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वाटा आहे,कारण राज्यघटनेनेच आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे.

           मला वाटतं सद्ध्यापुरतं एवढं पुरे आहे. शिवधर्माबद्दल आपल्या काही प्रामाणिक शंका असतील तर त्यांना उत्तर द्यायला मी सदैव तयार आहे , पण खोडसाळ शंकांना उत्तर देण्यापुरता शिल्लक वेळ माझ्याकडे नाही.

           आपल्या कडू असलेल्या प्रतिक्रिया थोड्या जर गोड झाल्या तर आनंदच होईल.मात्र सर्व पुर्वाग्रह सोडून एकदा तरी विचार करून पहा. "आपल्या जातीचे भेटो मज कोणी......"

          वाट पाहत आहे.

                           जय जिजाऊ!