सदर चर्चेत उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिली आहेत असे वाटत नाही. वरील प्रतिसादात आपण नीलकांत यांच्या शिवधर्म... काही प्रश्न ! या प्रतिसादातील प्रश्नांना उत्तरे द्यायचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे एकनाथ फडके यांच्या काही गोष्टी स्पष्ट करा या प्रतिसादातील प्रश्नांनासुद्धा उत्तरे द्यावीत ही विनंती. अन्यथा अडचणीत आणणारे प्रश्न तुम्ही सोयीस्कररीत्या टाळत आहात असे वाटेल.

आपल्या एकही प्रतिक्रिया नाही? या प्रतिसादातून अवघ्या दीड तासात प्रतिक्रिया याव्यात असा आग्रह दिसतो. एकनाथ फडके यांचा प्रश्न मांडणारा 'तो' प्रतिसाद साधारण १४ दिवसांपूर्वी आला होता. त्यांच्या प्रश्नांना आपलासुद्धा...

अनुल्लेखाने मारायचा विचार आहे की काय?

फडक्यांच्या प्रश्नांची उत्तरे पूर्वग्रहरहित, अभिनिवेशरहित तसेच तटस्थ शब्दांत आणि त्रयस्थ दृष्टिकोनातून मांडाल तर फार बरे होईल.