मराठी - संतांची भूमी आहे. हाच फार मोठा मुद्दा आहे.सर्व संतांची नावे आणी त्यांचे कार्य बघितले तरी पुरे.

महाराष्ट्रा समृद्ध संतपरंपरेचा वारसा आहे यात शंकाच नाही पण तामिळ संत परंपराही वाल्मिकी (?) पासून सुमारे २००० वर्षापूर्वी लिहिलेल्यातिरुक्कुरल पर्यंत सशक्त आहे. (मराठीचा इतिहास साधरण१२०० वर्षांचा.) मराठीतले जव्ळ जवळ सर्वच शब्द संस्कृत, पारसी, अरबी इत्यादीमधून आले आहेत (नवी भाषा असल्याने) तमिळचे तसे नाही.
महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळ ही फार मोठी जमेची बाजू होऊ शकेल महाराषट्राच्या बाजूने पण आजचे तामिळडूचे सामाजिक निर्देशांकही महाराष्ट्राच्या बरोबरीचेच आहेत. (केरळाचातर विषयच सोडा.)

भारतावर जी आक्रमणे झाली ती उत्तरेने थोपवली. अगदी महाराष्ट्राने सुद्धा. त्यामुळे दक्षिणेला फार तोशिस पडली नाही, संस्क्रुती टिकली.
जर हल्ले झाले असते तर त्यांना लुंगी सावरत पळावे लागले आसते.
असे म्हणणे भोमेकाकांनी म्हटल्याप्रमाणे अपरिपक्वपणाचे ठरेल. आक्रमणांचे श्रेय म्हणाल तर ते घ्यायला पंजाब व राजस्थान अधिक पात्र आहेत असे वाटते.

विषय भाषा असून सामर्थ्याचा वा अर्थिक क्षमतेचा नसावा असे वाटते.

असो. ही चर्चा मौजमजा सदरात आहे. त्यामूळे मराठीपेक्षा तमिळ किती व कशी वेगळी आहे हे प्रत्येक प्रतिसादाखाली उत्तराच्या स्वरूपाच्या देण्याच्या फंदात पडण्यात त्याला फारसा अर्थ दिसत नाही. शिवाय वाचणारेही सारे मराठीच. विषय मौजमजा असून, आकसाने प्रतिसाद दिले जाऊ नयेत इतकेच.