मुंबईत कोणी परभाषिक भीतीखाली वावरत असल्याचे जे सांगितलेत ते 'हास्यास्पद' आहे ! काही लोक (त्यात अगदी मराठी लोकही आहेत) असतीलही.
इथे काहीतरी गफलत आहे. 'कोणी' 'सारे' असल्यास वाक्य ठीक आहे. पण मग
मनकवडे 'सारे' म्हणत आहेत का? तसे त्यांच्या वाक्यावरून वाटत नाही.
पण आपण परप्रांतात विशेष करून द. भारतात गेलो तर आपल्याशी कोणी मराठीत/हिंदीत बोलायचा प्रयत्न केला आहे का ??
तो मराठीची आशा द. भारतात करत नाही. (काही मोजके भाग सोडल्यास.) असा
प्रयत्न करण्याविषयीच्या आपल्या प्रश्नाचे प्रयोजन समजले नाही. मराठी ऐवजी
मनकवड्यांप्रमाणे हिंदी/इंग्रजी वापरून पाहिले तर उत्तर 'होय. आहे पाहिले
इंग्रजीचा वापर करताना.'
त्यामुळे एकंदरीत आपली इतर संस्कृतींबद्दलची सहनशीलता कमी पडते.
अशी भिती त्यालाही वाटते. (हो आणि आर्थिक ताकदही! याला आपण सहनशीलता समजतो की काय?)
उ. भारतात जेव्हा मराठी माणूस हिंदी बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची खिल्ली उडविली जाते.
याचे कारण त्याचे व्याकरण असावे. मराठी माणसाचे हिंदी सहज ओळखता येते.
हे टाळायला हिंदी बोलण्याचा सराव हवा. (बंबैया हिंदी नव्हे!) सहजशक्य
असूनही, चांगले हिंदी ऐकायचा सराव असूनही, मराठी
माणूस चांगले हिंदी बोलत नाही हे वेगळेच शल्य आहे.
पण गुजराती लोक ? जिथे कुठे जातील तिथे गुजराती 'भाषा' घेऊन जातात ! हीच
गोष्ट पंजाब्यांची. यावरून 'मराठी माणूस त्या त्या ठिकाणच्या संस्कृतीत
मिसळून जातो' असा आपण असा निष्कर्ष काढला तर ते चुकीचे आहे काय ??
सहमत. हा मराठी माणसाचा चांगुलपणा आहे. हा इतरांच्यात नसेल तर तो त्यांना शिकवण्याची मराठी माणसाची पद्धतही तशीच चांगुलपणाची असायला हवी.
पण स्थानिक भाषा वेगळी असताना शालेय अभ्यासक्रमात 'सक्तीने' हिंदी घालण्याचे प्रयोजन काय ?
याचा उपयोग करून मराठी माणसाला भारतात कुठेही जाऊन व्यवहार करता यावा
असा असावा. जो मराठी माणसाला करता आला नाही व यावर सूड म्हणून की काय
त्याने ती अर्धवट, मोडकी तोडकी
हिंदी (जे हिंदीलाही पसंत नाही!) महाराष्ट्रातच
वापरायला घेतली असावी.
तसे बघितले तर सध्या जास्तीत जास्त भारतीय पर्यटक गुजराती/पंजाबी असतात.
पर्यटकांच्या सोयीसाठी त्यांच्या भाषेत पाट्या लिहिल्याचे ऐकले/पाहिले
नाही.
नुकत्याच वाचनात आलेल्या सर्वेक्षणात चक्क कन्नडिगांनी बाजी
मरली होती, त्यापाठोपाठ बंगाली होते बहुदा.
असो. असे उदाहरण हवे असल्यास पुरी ला भेट द्यावी. बऱ्याच पाट्या
इतकेच काय व्यवहारही बंगालीतून होताना दिसतील. (बऱ्याच पंजाबी ढाब्यांवर
पंजाबीत तर तमिळ खाद्यपदार्थांच्या दुकानावर तमिळमध्ये (भारतभर)
पाट्या सर्रास पाहता येतात. याला कारण 'बाजार' हेच असावे. खुद्द महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातच मल्याळी पाटी आह!े आता बोला. (आणि हो!
ही आपली सहनशीलता नव्हे बरे! त्या वाहतूक व्यवसायाशी आपल्याला देणे
घेणे नाही हे असावे.)
कृपया इंग्लिश मधून प्रश्न विचारू नयेत' अशा आशयाची कळकळीची विनंती लिहिली आहे. म्हणून नारिता मधी उतरणारे प्रवासी कमी झाले नाहीत.
(प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या नक्कीच कमी झाली असेल ;) )
आपल्याला जपानी विमानतळावर मराठी पाटी दिसली तर आपण जाल?
हो -
मराठी पर्यटक जेंव्हा इतका सशक्त , जागरूक होईल तेंव्हा ती पाटी आपल्याला
पहायला मिळेल. (नाही मिळाली तर आपण दुसऱ्या पर्यटन स्थळी जाल!)
नाही, सेवेचा दर्जा महत्वाचा पाटीशी काय देणे घेणे - मग यापेक्षा मराठी लोकांनी व्यवसाय सुरू करून, अधिक दर्जेदार माल, स्वस्त दरात देताना पाट्या मुद्दाम मराठीत ठेवणे हा यावरील उपाय असावा. (पण इतरांना तसे वाटत नाही? मग घेऊदे त्यांना कमी दर्जाचा माल!)
आपण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो त्यावेळी तिथली भाषा थोड्याफार प्रमाणात शिकून घेणे कधीही श्रेयस्कर
एकदम मान्य. म्हणून मराठी माणसाने इतर
भाषा
शिकाव्यात. पण त्यांनीही महाराष्ट्रात हाच लाभ मराठी शिकून घ्यावा हा आग्रह नव्हे?
असे न केल्याने त्यांचे होणारे नुकसान हे वैध 'बाजार' पद्धतीने करू नये का?
दंडुकेशाही वापरून
याचा अर्थ तो 'दंड' शाही असा घेतो. दंडूका न घेता.(कायद्यत दंडूक्याचीही तरतूद असल्यास कल्पना नाही.)
जरी हे मराठी लोक इंग्लिश मधे शिकले तरी जरा खरचटले तर तोंडातून 'आई गं' हेच बाहेर पडणार आहे.
असहमत. याला इतर भाषिकांत (हिंदी, तामिळ इत्यादी इत्यादी) तर बरेच अपवाद
दिसतात. मराठीत आपले म्हणणे खरे असेल तर मराठीचे भाग्य थोर आहे. तिच्या
भवितव्याविषयी चिंताच मिटली.
थोडक्यात मराठी माणसाने मराठी पाट्या असलेल्या दुकानांतूनच सामान वा
सेवा घ्याव्यात. पाहू आपली तेवढी खरेदी क्षमता आहे का. ती नसल्यास ती कमवू.
या नियमाचे स्वागत आहे. पण दंडुकशाहीचे नक्कीच नाही. हा कायदा ही तात्पुरती सोय असून मराठी ग्राहक सक्षम बनणे हा यावरील उपाय असू शकेल असे वाटते. मनकवडे यांचा दृष्टीकोन मराठीविरोधी वा तत्सम मुळीच वाटत नाही.