कॅनडाच्या क्युबेक राज्यात फ्रेंच भाषा टिकवण्यासाठी एक कायदा आहे. त्या मधील ठळक तरतुदीः

१. राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या फ्रेंच मध्येच असाव्या. इंग्लिश नाव पाटीवर लिहायचेच असेल तर इंग्लिश अक्षरे फ्रेंचच्या निम्मी असावी.
२. ज्यांच्या पालकांची मातृभाषा इंग्लिश नाही त्या मुलांना फ्रेंच शाळेत जाणे सक्तीचे आहे. (पर-राज्यातून क्यूबेक येउन आमच्यावर अन्याय होत आहे ही ओरड ऐकून घेतली जात नाही)

महाराष्ट्रात सुद्धा ह्या धरतीवर कायदा करावा.

फ्रेंच लोकांना त्यांच्या भाषेविषयी वाटणारा अभिमान आणि मातृभाषेत न लाजता बोलताना पाहिले की वाटते की अशी मानसिकता महाराष्ट्रामध्ये असती तर ... ही परिस्थिती आली नसती.