मित्रांनो,
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. मला एक सांगावेसे वाटते - आपल्या पुस्तकांच्या केवळ यादीऐवजी प्रत्येक पुस्तकाबद्दल निदान चार ओळी लिहू शकलात तर खूप मजा येईल. (नंदन सारख्याना इतक्या पुस्तकांबद्दल लिहिता येणार नाही एकदम; पण ३-४ पुस्तकांबद्दल लिहिलेत तरीसुद्धा चालेल.) माझे म्हणणे इतकेच की कधीकधी आपल्या चर्चेला इंस्टंट काफीऐवजी मुरवून , शांतलयीत आस्वाद घेण्याच्या वाईनचे स्वरूप देण्यातसुद्धा मजा आहे; खरे ना?