जी.ए. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे ह्यांची सर्व पुस्तके पण त्याच बरोबर वि. स. वाळिंबे यांची इतिहासावरील पुस्तके खूप छान आहेत.
मला त्यांतील सर्वात आवडलेले पुस्तक म्हणजे, 'इस्त्राईलचा वज्रप्रहार' ह्या छोटेखानी पुस्तकात, अजूनही चिघळत असलेल्या ह्या जागतिक प्रश्नाविषयी सुंदर माहिती मिळाली. इतिहासाविषयी वाचायची गोडी नसणाऱ्यांना (माझ्यासारख्या) सुद्धा वाळिंबे ह्याचे लेखन त्यांच्या शैली मुळे आवडते.
हे झाले आवडत्या पुस्तकांविषयी. नुकतेच 'मोरपिसे, नावाचे अनुराधा गानू यांचे पुस्तक वाचले. आपल्या अमेरिकेतील प्रदीर्घ वास्तव्यावर आधारीत लेखांचा हा संग्रह आहे. केवळ आपण परदेशात इतकी वर्षे राहिलो ह्या भांडवलावर बाकीचे काहीही कर्तृत्व नसताना आत्मचरित्रपर पुस्तक वाचून मजा आली. आपण आता सर्वज्ञ झालो आहोत आणी कशावर काहीही बोलत सुटू शकतो असा भ्रम होऊन त्यावर पुस्तक छापले आहे. आपल्या ओघवत्या भाषेत जगातील पहिल्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी म्हणून, SAS चा उल्लेख केला आहे (आम्ही उगीचच Microsoft समजत होतो).
आपल्या आवडत्या पुस्तकांबरोबर नावडत्या पुस्तकांविषयीही माहिती दिली तर तिही वाचण्यास मजा येईल.