वरुण,
तुमचा अतिशय प्रामाणिक असा प्रतिसाद वाचून आनंद झाला. वाळिंब्यांची काही पुस्तके वाचली आहेतच. इस्त्रायल बद्दलचेही वाचेन.(मिळेल तसे).
पण तुमचा प्रतिसाद आवडला तो तुमच्या दुसऱ्या अभिप्रायामुळे. जे वाटले ते स्पष्ट लिहून, नीरक्षीरविवेकाचेच दर्शन तुम्ही घडवले आहे.
मला न आवडलेले एक पुस्तक (एका अर्थाने अतिशय करमणूक करणारे असेही) म्हणजे जयश्री गडकर यांचे आत्मचरित्र- 'अशी मी जयश्री'. अहंमन्यता, ढोंगीपणा वगैरेंचे दर्शन घडवणारी असली पुस्तके कितीही टाकाऊ असली तरी त्यांना एक, प्रचण्ड मोठे असे करमणूकीचे मूल्य असते, या निष्कर्षांप्रत मी आलेलो आहे.....