आवडीची यादी देण्याएवढं माझ वाचन नाही. पण मी वाचलेली काही पुस्तकं -
१. मृत्युंजय (शिवाजी सावंत) - कर्णासारख्या विषयावर लिहिलेले हे
पुस्तक आणि लिहिण्याची पध्दत सगळे आवडले. काही ठिकाणी कर्ण आणि
अश्वत्थामा यांच्यातील संभाषण जास्त खेचलेलं वाटतं. पण एकूणच हे पुस्तक
परत परत वाचण्यासारखं आहे.
२. राजा शिवछत्रपती (बाबासाहेब पुरंदरे) आणि श्रीमान योगी (रणजीत
देसाई) -आवडीच्या विषयावर चांगले वाचायला मिळाले तर "सोने पे
सुहागाच" -शिवाजींवर लिहीलेली दोन्ही पुस्तके मस्तच आहेत.
प्रसंगवेगवेगळ्या प्रकारे रंगवून सुध्दा दोन्ही पुस्तके वाचन खिळवून
ठेवतात.
३. वपुवाई , आपण सारे अर्जुन (व. पु. काळे) - वपुंचे एकुणच लेखन खुपआवडले.
अजूनही काही आहेत .. लिहीनच हळुहळू.
केतन