विठ्ठ्लाला आमचा विरोध नाही कारण ती महाराष्ट्रातील बहुजन समाजाची देवता आहे.तिथे जातीभेद नाही.विठोबा जसा ज्ञानेश्वरांचा आहे तसा तो चोखाचाही आही.पण विठ्ठलाच्या बडव्यांना मात्र आमचा विरोध आहे.(देव आणि माणूस यांत दलाल नको)

छान... मग विट्ठलाच्या देवळाप्रमाणे इतर ठिकाणांबद्दल विरोध का नाही ? 
उदाः वैष्णोदेवी, शिरडी किंवा सुवर्ण मंदिर - मग त्याबद्दल आपण काय करू शकता ?

संत ज्ञानेश्वर आम्हा सर्वांनाच वंदनीय आहेत,त्यांना आमचा विरोध असूच शकत नाही.आमचा विरोध त्यांना आहे जे फ़क्त सोयिस्कर संतांनाच मोठं करतात आणि इतरांना अनुल्लेखाने मारतात. संत ज्ञानेश्वर, रामदास आणि एकनाथ हे सोडून इतरही संत महाराष्ट्रात आहेत.

आषाढी एकादशी निमित्ताने मी संतांच्या अभंगांचा एक उपक्रम मनोगतावर मागे दिला होता..... त्यावरील प्रतिसाद वाचा मग कळेल कोण कोणास अनुल्लेखाने मारत आहे ते !  

तेरवी ई. संस्कारांना शिवधर्मातून पुर्ण फाटा देण्यात आला आहे.पण नामकरणासारखे संस्कार आवश्यक आहेत,त्यांच्यासाठी ब्राह्मणांची किंवा त्यासदृश कुणाचीही आवश्यकता नाही.

माझ्या मते अग्नीदाह संस्कारावर पण बहिष्कार घालून देहदान/नेत्र व किडनी दान करावे म्हणजे कमीत कमी गरजूंचा तरी फायदा होईल. आपले मत माझ्या सारखेच पुढारलेले असल्यास आपण आपल्या समाजातल्या मंडळींनी देहदाना बद्दल प्रोत्साहन करणार का ? तसेच आपल्या समाजातली मंडळी देहदान कितपत करतील ह्याचा विचार आपण केला आहे का ?

नामकरण संस्कारात ब्राह्मणांची आवश्यकता लागते हे नवीन ऐकण्यात आले.....
माझ्या बारशापासून ते माझ्या मुलींच्या बारशापर्यंत एखाद्या ब्राह्मणाने नामकरण विधी आमच्या घरात केल्याचे ऐकीवात किंवा पाहण्यात नाही. आपण आपल्या घरात असा विधी केला असल्यास ते थोतांड आपण स्वतः सुरू केल्याचे मी म्हणेन !
अहो महाशय, हिंदू धर्मातले मूल जन्मता हिंदू असते..... व त्याला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायला बाप्तिस्मा वगैरे सारख्या विधींची  आवश्यकता पडत नाही.

शिवधर्मात आल्यानंतर जर कुण्या कुणाला जर आंतरजातीय विवाह करावयाचा असेल तर त्यांना प्रोत्साहनच दिल्या जाईल,पण कुणी आंतर्जातीय विवाहच करावा अशी जबरदस्ती आम्ही कशी करू शकतो.

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन हे स्वागतार्ह्य आहेच पण हुंड्याबद्दल आपण मराठा व इतर समाजाचे कसे प्रबोधन करणार ते ही कळवावे.
आमच्या गावी सध्या इंजिनियर वराचा भाव ८० X ८० चालत आहे ( ८० बाय ८० म्हणजे ८० हजार कॅश व ८० तोळे सोने !) आपल्या कडचा भाव काय आहे तोही जरा कळवावा !

७)वैयक्तिक माझं म्हणाल तर मी काही महिन्यांअगोदर एक अतिशय हिंदुत्ववादी वगैरे विचारांचा माणूस होतो,पण जसजसे डोळे उघडायला लागले, मी मनाने शिवधर्मी झालो.

शिवधर्मातल्या उणीवा नष्ट होईपर्यंत अजून एखाद्या पंथाची स्थापना नक्कीच झालेली असेल..... शुभेच्छा !

ब्राह्मणांना आमचा विरोध होत आहे हे मंजूर आहे,त्याचं कारण असं की आम्ही त्यांना ज्ञानशत्रू मानतो. पिढ्यान पिढ्या पासून जो वर्ग बहुजन समाजापासून ज्ञान लपवून ठेवत आहे त्यांना ज्ञानशत्रू म्हणावे नाही तर काय?

नाचता येईना अंगण वाकडे !

बहुजन वर्ग मागासलेला असण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे विद्येचा अभाव , आणि याला कारण ब्राह्मण !

मागे त्सुनामी आलेली होती.... त्यालाही ब्राह्मणच कारणीभूत होते हे माहीत नसावे आपणांस !

जेव्हा आम्ही त्यांच्या पुढारलेल्यापणाचा आणि आमच्या मागासलेपणाचा विचार करतो तेव्हा विचार येतो तेव्हा लक्षात येतं की आमचा शिक्षणाशी संबंध फ़क्त गेल्या दोन-तीन पिढ्यांचा आहे,आणि ते युगांपासून ज्ञान इतरांपासून लपवून स्वतःच खात आहेत,अणि आता आम्हाला आता त्यात वाटा हवा आहे.

ज्ञानोपासना व अस्खलित बोली बोलण्यासाठी लागणारी मेहनत घ्या आपोआप सर्व साध्य होईल.... एकलव्याने फक्त द्रोणाचार्यांचा पुतळा समोर ठेवून ज्ञानोपासना केली होती (ज्ञानेश्वरांबद्दल लिहीण्या इतकी लायकी माझी नाही पण येथे फक्त उदाहरण देतो) ज्ञानाचे वाटे मागून कसे मिळणार ?
अहो महाशय ज्ञान संपादन करावे लागते - ते बाजारात विकत मिळाले असते तर, मोठं मोठ्यांची पोरं तितकीच मोठी झाली असती नाही का ?

मला वाटतं सद्ध्यापुरतं एवढं पुरे आहे. शिवधर्माबद्दल आपल्या काही प्रामाणिक शंका असतील तर त्यांना उत्तर द्यायला मी सदैव तयार आहे , पण खोडसाळ शंकांना उत्तर देण्यापुरता शिल्लक वेळ माझ्याकडे नाही.आपल्या कडू असलेल्या प्रतिक्रिया थोड्या जर गोड झाल्या तर आनंदच होईल.मात्र सर्व पुर्वाग्रह सोडून एकदा तरी विचार करून पहा. "आपल्या जातीचे भेटो मज कोणी......"

 आपणही शंकांचे निरसन करावे - ही खोडसाळ मागणी समजून नजरेआड केल्यास त्यात तोटा आपल्या शिवधर्माचा असेल !