चित्रवर्णन खरंच छान !! ही सगळी चित्रे इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद !! स्वतंत्र भारतातील जय जवान जय किसान, चरखा ही तिकिटे अझाद हिंद सेनेच्या टपाल तिकिटांवरूनच घेतली का ?
सुभाषबाबूंच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. त्याबद्दल सुभाषबाबूंचा मृत्यू झालाच नाही, ते नाव बदलून राहत आहेत(होते) इथपासून अपघात, घातपात अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या आहेत. या विषयी वाचायला किंवा कोणाकडची माहिती ऐकायला आवडेल.