अदिती, तुझा प्रतिसाद वाचून आनंद झाला. "प्रथमग्रासे" मला हे सांगू दे, की मी कुणीही महारथी नाही आहे. या धाग्याचे प्रयोजनच मुळी असे होते की, कितीही वाचन केले तरी आपण अपुरेच पडणार.तस्मात इतरांकडून कमीत कमी न वाचलेल्या पुस्तकंबद्दल ऐकावे तरी...

अदिती यांच्यासारख्यांच्या प्रतिसादातून आपल्या सर्वांमधे विचक्षण वाचकच नव्हेत तर उन्मेषशाली लेखक/लेखिकाही आहेत याचा अनुभव येतो खरा..

'चीपर बाय द डझन' हा चित्रपट मी पाहिला आहे, आणि अत्यंत निराश झालो. गाल्ब्रेथ यांच्या सुंदर पुस्तकाशी त्याचा आंघोळीइतकाही संबंध नाही...

'तोतोचान' आणि त्या दुसऱ्या जपानी पुस्तकांबद्दल वाचून त्यांबद्दल पराकोटीची उत्सुकता वाटून राहिली आहे..