माझ्याही माहितीत असे बरेच लोक आहेत, ते म्हणतात की परत आम्ही भारतात गेलो तर तेथील वातावरणात रमू शकू का? किंवा मिळते जुळते घेता येईल का? पण मला हे समजत नाही भारतात जन्म घेतलात ना? येथील सवयीमुळे परत मिळतेजुळते घ्यायला थोडा त्रास होईल, पण नंतर सवय होईल.

भारत हा भारताच्या जागी आहे आणि इतर देश त्यांच्या जागी आहेत, पण येथील भारतीय लोक तुलना करण्यात आणि आपल्या देशाला नावे ठेवण्यात अगदी पटाईत आहेत. आता येथे कायमस्वरूपी राहायचे का नाही तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण किमानपक्षी भारताला नावे तरी ठेउ नका. यहॉ बहुत सुकुन है! इंडियामें क्या रखा है? वगैरे बोलताना आढळतात.