कित्येक भारतीय सध्या परदेशात रहात आहेत. माझ्या मते ते भारतासाठी योग्यच आहे. (एका दृष्टीने ....)

भारतीय संस्कृती भावनाप्रधान आहे. पाश्चिमात्य संस्कृती भौतिक सुखात बुडालेली आहे (खरच?). प्राचीन काळी हिंदुस्तान हा सर्वात सधन, संपन्न मुलुख होता. मात्र कुटुंबवत्सलता आणि सधनता ह्यामुळे स्वतःच्या सर्व गरजा (मानसिक व भौतिक) पुर्ण करण्यास हा प्रान्त समर्थ होता. त्यामुळे देशाटन करण्याची येथील माणसाला कधी गरजच भसली नाही. (कुठली इतिहासामधली लढाई आठवत आहे ज्यात आपण दुसऱ्यावर आक्रमण केले आहे?)

आपण कधी देशाटन केले नाही, म्हणून तर आपल्याला इतकी वर्षे पारतंत्र्यात काढावी लागली. मात्र त्याचा एक फायदा मात्र नक्की झाला आहे. इंग्रज जाताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट देऊन गेले, ती म्हणजे एकी. एंग्रजांविरुद्ध लढताना पहिल्यांदाच सम्पूर्ण हिंदुस्तान एका छत्राखाली आला.

परदेश गमनामुळे, आता भारतात एक नवी संस्कृती निर्माण होत आहे, जी भावनाप्रधान भरतीय व पाश्चिमात्य ह्यांचा संगम असेल. जे एतिहासाचा विचार केल्यास भारताच्या हीताचेच आहे.

तुम्ही कुठेही रहा, तुमच्या मनात मी भारतीय आहे, ही भावना जिवंत असणे आवश्यक आहे. आजोबा नातवाला महाभारताच्या गोष्टी पिझ्झा हट मधे बसुन सांगत आहेत, हेच भारत २०२० चे चित्र आहे काय?