भारताच्या महामहिम राष्ट्रपतींनी हैदराबाद येथील एका भाषणात असे काहीसे उद्गार काढले आहेत (हे मी केलेले भाषांतर आहे(म्हणजे मला समजले तसे!), कृपया मूळ भाषण वाचावे - पाहिजे असल्यास मी ई-मेल करू शकेन)
"........त्यांच्या व्यवस्थेचे कौतूक करीत करीत, आळशी भ्याडांप्रमाणे आम्ही अमेरिकेत पळतो. न्यूयॊर्कला थोडे काही खुट्ट झाले की आपण इंग्लन्डला पळतो. तिथे बेकारी वाढली आणि नोकऱ्या मिळेनाश्या झाल्या की पहिल्या विमानाने आखातात पोहचतो. तिथे युद्ध सुरू झाले आणि असुरक्षितता वाढली, की भारत शासनाने आपल्याला इथुन सोडवून सुरक्षित स्थळी पोहचवले पाहीजे अशी अपेक्शा करतो. कोणी देशाचा विचार करत नाही, प्रत्येकजण स्वतःपुरता विचार करतो (एवरीबडी इज आऊट देअर टू ऎब्युज ऎंड रेप द कंट्री). आमची सदसदविवेकबुद्धी ही पैशाला विकली गेली आहे! (अवर कोनसायंस इज मॊर्टगेजड टू मनी)........"
स्थलांतर, देशांतर, धर्मांतर इ. करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. संवेदना जागृत ठेवून, स्वतःच्या करीयर वगैरेचा विचार न करता, काही लोक आपण जिथे जन्मलो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो अशी उदात्त भावना ठेवून स्वदेशात परत येतात. असे त्यागमूर्ती कमी, पण ते देश सोडणाऱ्यांपेक्षा तुलनेने श्रेष्ठ वाटतात.